Sakshi Sunil Jadhav
चाणक्य नीती आजच्या काळातही तितकीच लागू पडते. चाणक्यांनी सांगितले आहे की चुकीच्या लोकांशी मैत्री किंवा जवळीक ठेवल्यास व्यक्तीचे नुकसान, प्रतिष्ठा आणि आर्थिक तोटा होऊ शकतो.
यश, श्रीमंती आणि सुरक्षित जीवन हवे असेल, तर काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून लांब राहणे गरजेचे आहे. चाणक्यानुसार, या ५ प्रकारच्या लोकांशी मैत्री केल्यास व्यक्ती अडचणीत येऊ शकतो, चुकीचे निर्णय घेऊ शकतो आणि आयुष्यात प्रगती थांबू शकते.
खोटे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री केल्यास व्यक्ती स्वतःही चुकीच्या मार्गावर जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि त्यांच्या वागणुकीमुळे तुमची प्रतिमा बिघडू शकते.
चाणक्य म्हणतात की, ज्या लोकांना मेहनत करायची सवय नसते, त्यांचे नुकसान त्यांच्यासोबत राहणाऱ्यांनाही सोसावे लागते. मेहनत टाळणाऱ्या व्यक्तींशी जवळीक ठेवल्यास प्रगती थांबते.
लोभी आणि स्वार्थी लोकांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो. ते कधीही विश्वासघात करू शकतात. चाणक्यानुसार, स्वार्थी लोकांपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.
रागीट आणि संतापी स्वभावाचे लोक हे लोक क्षणात चुकीचे निर्णय घेतात आणि नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात. त्यांचा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्यावरही होतो.
दारू, जुगार, वाईट सवयी असलेले मित्र आयुष्य उद्ध्वस्त करतात. चाणक्यानुसार, अशा व्यक्तींसोबत राहिल्यास आपली आर्थिक स्थिती आणि मानसिक शांती दोन्ही धोक्यात येतात.
राग, अतिआनंद, लोभ हे विनाशाचे कारण ठरतात. संपत्ती वाढवण्यासाठी विवेकपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे.
आत्मविश्वास असला, तर अर्धी लढाई जिंकलेलीच असते. वेळ वाया घालवल्यास संधी हातातून निसटतात. त्यामुळे वेळेची किंमत ओळखा.