Sakshi Sunil Jadhav
कच्च्या भाज्यांचे अनेक फायदे सांगितले जात असले, तरी त्यांचे जास्त प्रमाण आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कच्च्या भाज्यांमध्ये असलेले काही घटक पचन बिघडवतात, शरीरातील खनिज शोषण कमी करतात आणि काही वेळा किडनी स्टोनच्या धोक्यातही वाढ करतात.
शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत कच्च्या भाज्या शरीराला पचायला अधिक कठीण जातात. त्यामुळे पोटफुगी, गॅस आणि जडपणा जाणवतो.
कच्च्या भाज्यांमध्ये काही अँटी-पोषक घटक असतात, जे शरीरातील पौष्टिक तत्वांचे शोषण रोखतात.
कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया अधिक प्रमाणात असू शकतात. जे फक्त धुण्याने नष्ट होत नाहीत. पोटाचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात कच्च्या भाज्या खाल्ल्यास मळमळ, चक्कर, थकवा, पोटदुखी, जुलाब, IBS सारखी लक्षणे दिसू शकतात.
काही कच्च्या पालेभाज्यांमध्ये ‘ऑक्सलेट’चे प्रमाण जास्त असते. हे किडनीत जमा होऊन स्टोन तयार करू शकते.
हलके वाफवणे, उकळणे किंवा मसाल्यांसह शिजवल्यास पोषक तत्व टिकून राहतात आणि पचायलाही सोपे होते.
अॅल्युमिनियम व तांब्याच्या भांडी भाज्यांशी रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे स्टील किंवा लोखंडी भांडी सुरक्षित मानली जातात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.