Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Mumbai Mega block : मध्य-हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर येत्या रविवारी, ३० नोव्हेंबरला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर तर कडकडीत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Mumbai Railway Megablock
Mumbai Railway Megablocksaam tv
Published On

मध्य रेल्वेकडून रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी, ३० नोव्हेंबरलाही मध्य रेल्वेने नेहमीप्रमाणं मेगाब्लॉक घेतला आहे. या दिवशी अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिन्ही मार्गांवर (Mumbai Local Train) मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्यानं या दिवशी प्रवाशांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर CSMT - विद्याविहार

मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार या दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३. ५५ या वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.

या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर ११ ते ४.०५ पर्यंत..

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर ११.०५ ते ४.०५ पर्यंत

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४५ ते ३.१२ पर्यंत बेलापूर-पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द

Mumbai Railway Megablock
Ghatkopar Railway Station: ३ ब्रीज, एलिव्हेडेड डेक अन्...; घाटकोपर रेल्वे स्टेशनचा कायापालट, प्रवाशांची गर्दीतून होणार सुटका

ट्रान्सहार्बर: ठाणे-पनवेल

ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल येथून ११.०२ ते ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या आणि ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि

ठाणे येथून १०.०१ ते ३.२० पर्यंत सुटणाऱ्या, तसेच पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष लोकल धावणार

मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असणार आहेत. तसेच ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असतील.

Mumbai Railway Megablock
Panvel-Karjat Railway: पनवेल- कर्जत प्रवास फक्त ३० मिनिटात, कधी सुरू होणार मार्ग, वाचा संपूर्ण A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com