Bypass surgery: हार्ट बायपास सर्जरी झालीये? दिवसागणिक काय आणि कशी काळजी घ्याल हे समजून घ्या तज्ज्ञांकडून...

Bypass surgery: तुमची नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे का? शस्त्रक्रियेनंतर कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल तुम्हाला चिंता याची काळजी सतत आहे का? तर चिंता करू नका. बायपासनंतर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आज डॉक्टरांकडून जाऊन घेऊया.
Bypass surgery
Bypass surgerysaam tv
Published On

हृदयाची बायपास शस्त्रक्रिया ज्याला वैद्यकीयदृष्ट्या कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG) म्हणून ओळखली जाते, ही हृदयाच्या धमन्या अरुंद झाल्यावर रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. अनेकदा एथेरोस्क्लेरोसिसच्या तुलनेने, ही स्थिती हृदयाच्या स्नायूंच्या महत्त्वपूर्ण भागात ऑक्सिजन-समृद्ध रक्त पोहोचण्यापासून मर्यादित करते, ज्यामुळे छातीत दुखू शकते किंवा हृदयाशी संबंधित गंभीर घटना उद्भवू शकतात. त्यामुळे बायपास सर्जरीची गरज भासू शकते.

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे म्हणाले की, केवळ रक्ताभिसरण वाढवणं हे बायपास शस्त्रक्रियेमागेचं उद्दिष्ट नाही तर रूग्णांच्या एकूण आरोग्यासाठी त्याची मदत होते. शस्त्रक्रिया तंत्र आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कमीत कमी पर्याय उपलब्ध झाले आहेत जे सुरक्षित, प्रभावी आणि बरे होण्याचा कालावधी कमी करतात.

Bypass surgery
Cancer treatment effects on fertility: कॅन्सरच्या उपचारपद्धतींमुळे महिला-पुरुषांना वंध्यत्वाचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकी कारणं सांगितली!

बायपास शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत डॉ. भामरे यांनी माहिती दिलीये.

  • तुम्ही बायपास सर्जरीमधून बरे होत असताना सर्जरीनंतरचा एक महिना अतिशय महत्त्वाचा असतो. यावेळी सुरुवातीचे ७ दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये रहावं लागतं ज्यामध्ये ३ दिवस आयसीयुमध्ये असतात.

  • आयसीयुमधून बाहेर आल्यावर तुमच्या जीवनावश्यक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर आणि इतर नळ्या एकामागून एक काढून टाकल्या जातात. बहुतेक आयसीयू रुग्णांना बरे करण्यासाठी फास्ट ट्रॅक प्रोटोकॉलचे पालन केलं जातं.

  • शस्त्रक्रियेच्या 2 दिवसांनंतर तुम्ही चालायला सुरुवात करु शकता. टाक्यांमुळे वेदना होऊ शकतात मात्र दिवसांनी 50% आणि नंतर चौथ्या दिवशी 10 टक्क्यांपर्यंत कमी होते.

  • सुरुवातीला तुमचं चालणं 5 ते 7 मिनिटांचे असू शकतं. त्यानंतर नंतर दिवसेंदिवस तुमची ताकद वाढत जाते. त्यामुळे एका महिन्याभरातच तुम्ही दिवसाला 40 मिनिटं चाललं पाहिजे आणि एकाच वेळी न चालता 20 मिनिटांच्या दोन टप्प्यात हे पूर्ण करु शकता.

  • यावेळी खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे आणि तो शस्त्रक्रियेच्या तारखेपासून 2 महिन्यांपर्यंत केला पाहिजे.

  • बरे होत असताना कधीतरी तुम्हाला उत्साही वाटू शकतं. यावेळी तुम्हाला काही वेळेस तुम्हाला थकल्यासारखं वाटून विश्रांती घ्यावी लागू शकते. तुमच्या सर्जिकल टीमने दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला हाताच्या स्वच्छतेसह स्क्रब बाथ किंवा वॉटर बाथद्वारे दैनंदिन त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे.

Bypass surgery
Breast Cancer: घट्ट ब्रा घातल्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो? डॉक्टरांनी दिलं खरं उत्तर पाहा!
  • तुम्ही पूर्णपणे बरे होईपर्यंत म्हणजेच 4 ते 6 आठवड्यांपर्यंत पुढे वाकणं, कुशीवर किंवा पोटावर झोपू शकत नाही.

  • घरातल्या घरात तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता आणि तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, स्ट्रेचिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता.

  • तुम्ही बायपास शस्त्रक्रियेतून बरे होत असताना घरी शिजवलेलं अन्न जे पचायला हलकं असतं आणि बरं होण्यासाठी पुरेशी ऊर्जा देते. दूध, पनीर, सोया, विविध कडधान्ये, दही, बटर मिल्क सोबत हिरव्या भाज्या, चपाती आणि तांदूळ यातील प्रोटीन बरं होण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी पुरेशी आहेत. साधारणपणे २ ते ३ आठवडे जखम बरी होण्याकरता ड्रेसिंग करावं लागतं.

  • धूम्रपान आणि तंबाखू, अल्कोहोलचे सेवन टाळलं पाहिजे. साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन कमी करून विविध फळं, भाज्या आणि तृणधान्यांचा आहारात समावेश करा.

Bypass surgery
Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?
  • शस्त्रक्रियेनंतर जास्त वजन वाढण्याचं कारण म्हणजे पाणी. बरे होत असताना काही आठवडे पाण्याचे सेवन मर्यादित करणं गरजेचं आहे.

  • नियमित शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त रहा कारण मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब हे हृदयविकाराच्या जोखमीचे घटकांच्या व्यवस्थापनात व्यायामाची भूमिका महत्त्वाची आहे.

  • डॉक्टरांच्या परवानगीनंतर किमान 30 मिनिटं हलका व्यायाम करा. योग आणि ध्यान यांसारख्या माइंडफुलनेस पद्धतींसह तणावाचं व्यवस्थापन करा. तुम्हाला चिंता किंवा नैराश्य सतावत असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

  • हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. दररोज किमान 8 तास झोपा आणि तुम्हाला बरे वाटेल.

  • डॉक्टरांनी सुचविलेल्या औषधोपचारांचे पालन करणे आणि नियमित फॉलोअप आणि तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com