Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?

Metastatic breast cancer: चौथ्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाचा कॅन्सर ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर (एमबीसी)'मुळे रूग्‍ण व त्‍यांच्‍या कुटुंबांना अद्वितीय आव्हानांचा सामना करावा लागतो.
Metastatic breast cancer
Metastatic breast cancersaam tv
Published On

सध्या देशासह संपूर्ण जगभरात कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. चौथ्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाचा कॅन्सर ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर (एमबीसी)'मुळे रूग्‍ण व त्‍यांच्‍या कुटुंबांना अद्वितीय आव्हानांचा सामना करावा लागतो. सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाच्या कॅन्सरच्या तुलनेत एमबीसी हा असा कॅन्सर आहे, जो स्‍तनाव्‍यतिरिक्‍त हाडं, यकृत किंवा फुफ्फुसं अशा शरीराच्‍या इतर भागांमध्‍ये पसरतो.

अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे. तसेच, या कर्करोगाबाबत समज व गैरसमजूतींमध्‍ये वाढ होताना देखील निदर्शनास येत आहे. या समजामुळे भितीचे वातावरण निर्माण होतं. महिला योग्‍य उपचार घेण्‍यापासून परावृत्त होऊ शकतात. योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी प्रग‍त उपचारांसह उपलब्‍ध सर्व पर्यायांबाबत माहिती असणं गरजेचं आहे.

Metastatic breast cancer
पीसीओएसचा प्रकरणांमध्ये 50% टक्क्यांनी वाढ; 25 वर्षावरील महिलांसाठी तज्ज्ञांनी दिला सल्ला

खर्च होत असला तरी उपचाराचे दीर्घकालीन फायदे जीवनाचा दर्जा दीर्घकाळापर्यंत उत्तम ठेवण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. उपचारांच्‍या निष्‍पत्तींबाबत संपूर्ण माहितीसाठी आणि वैयक्तिकृत निर्णय घेण्‍यासाठी आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांसोबत खुल्‍या मनाने सल्‍लामसलत करणं आवश्‍यक आहे. समजांना दूर करत आणि अचूक माहिती देत रूग्‍ण उपचाराच्‍या उत्तम निष्‍पतींचा अनुभव घेण्‍यासोबत आरोग्‍यदायी जीवन जगू शकतात.

एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. शिवम शिंगला म्‍हणाले, “वर्षानुवर्षे मी निरीक्षण केलंय की, जवळपास २० टक्‍के रूग्‍ण मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या लक्षणांबाबत समज आणि गैरसमजांना बळी पडतात. रूग्‍ण आि केअरगिव्‍हर्सनी उपचार पर्याय व निष्‍पत्तींबाबत अर्थपूर्ण संवाद साधणं, त्याचप्रमाणे मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह जगण्‍याच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करणे महत्त्वाचे आहे.

Metastatic breast cancer
Cancer treatment effects on fertility: कॅन्सरच्या उपचारपद्धतींमुळे महिला-पुरुषांना वंध्यत्वाचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकी कारणं सांगितली!

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत काय गैरसमज आहेत, ते जाणून घेऊया.

समज - मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह निदान म्‍हणजे तुमच्‍याकडे जगण्‍यासाठी काहीच दिवस उरले आहेत.

तथ्‍य- मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर पूर्णपणे बरा होत नसला तरी त्‍यावर उपचार करता येऊ शकतो. या कर्करोगासह निदान झालेले अनेक रूग्‍ण दीर्घकाळापर्यंत जगू शकतात, ज्‍यासाठी त्‍यांनी लक्ष्यित उपचार, इम्‍यूनोथेरपीज व हार्मोन थेरपीज अशा प्रगत थेरपी उपचारांचे पालन केले पाहिजे. यामागे कर्करोगावर नियंत्रण, लक्षणे कमी करणे आणि जीवनाचा दर्जा सुधारण्‍याचे ध्‍येय आहे. प्रत्‍येक रूग्‍णाचा मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसंदर्भातील अनुभव वेगळा असतो आणि योग्‍य उपचार व्यवस्थापनासह अनेकजण अपेक्षेपेक्षा दीर्घकाळापर्यंत उत्तम जीवन जगू शकतात.

समज - रूग्‍णाने योग्‍य खबरदारी न घेतल्‍यामुळे स्‍तनाचा कर्करोग मेटास्‍टॅटिक स्‍वरूपात पुन्‍हा होऊ शकतो.

तथ्‍य- स्‍तनाचा कर्करोग मेटास्‍टॅटिक स्‍वरूपात पुन्‍हा होण्‍यासाठी रूग्‍णाकडून कोणत्‍याही निष्‍काळजीपणाचे परिणाम नाही. रूग्‍ण त्‍यांच्‍या उपचार योजनेचे पालन करत असले तरी कर्करोगाच्‍या गुंतागुंतीच्‍या जीवशास्‍त्रामुळे कर्करोग पसरू शकतो किंवा पुन्‍हा होऊ शकतो. मेटास्‍टॅटिक स्‍तनाचा कर्करोग होण्याला प्रतिबंध करण्‍याचा कोणताही खात्रीदायी उपचार नाही.

समज - मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी केमोथेरपी एकमेव उपचार पर्याय आहे.

तथ्‍य - केमोथेरपी मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी उपलब्‍ध विविध उपचार पर्यायांपैकी एक आहे. कर्करोगाच्‍या विशिष्‍टतेनुसार लक्ष्यित थेरपी, इम्‍यूनोथेरपी व हार्मोन थेरपी असे विविध प्रगत उपचार पर्याय आहेत, जे अधिक गुणकारी ठरू शकतात. कर्करोगाचा विशिष्‍ट प्रकार व त्‍याच्‍या वर्तणूकीनुसार उपचार केला जातो आणि अनेक रूग्‍णांना कमी प्रतिकूल परिणामांसह आजाराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या थेरपीजच्‍या एकत्रिकरणामधून फायदा होऊ शकतो. योग्‍य उपचार योजनेची निवड करण्‍यासाठी डॉक्‍टरांसोबत उपलब्‍ध सर्व पर्यायांबाबत सल्‍लामसलत करणे महत्त्वाचे आहे.

Metastatic breast cancer
Cancer Causing Habits : रोजच्या जीवनातील या वाईट सवयी म्हणजे कॅन्सरला निमंत्रण; आजपासूनच स्वतःमध्ये करा हे बदल

समज - मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍णांना सतत वेदना होत राहतील.

तथ्‍य- मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर विशेषत: हाडांपर्यंत पसरत असल्‍यामुळे वेदना होऊ शकतात, पण आधुनिक उपचार व वेदना व्‍यवस्‍थापन धोरणांमुळे अस्‍वस्‍थता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍ण वेदना व्‍यवस्‍थापन धोरणे व उपचार योजनांसह सक्रिय, समाधानकारक जीवन जगू शकतात.

समज - फक्‍त वृद्ध महिलांना मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर होतो.

तथ्‍य- मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर तरूण महिलांसह कोणत्‍याही वयोगटातील व्‍यक्‍तींना होऊ शकतो. वय जोखीम घटक असला तरी तरूण व्‍यक्‍तींना देखील स्‍तनाचा कर्करोग होऊ शकतो. म्‍हणून वय कितीही असो सर्वांनी लक्षणे व जोखीम घटकांबाबत जागरूक असणे आवश्‍यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com