Cancer Causing Habits : रोजच्या जीवनातील या वाईट सवयी म्हणजे कॅन्सरला निमंत्रण; आजपासूनच स्वतःमध्ये करा हे बदल

Heath News : आज या बातमीमधून रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कॅन्सरपासून दूर राहिले पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कॅन्सरपासून दूर राहिले पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Lung CancerSaam TV
Published On

कॅन्सर म्हणजे एक असा आजार ज्यामध्ये तुमचा मृत्यू निश्चित असतो. कॅन्सर विविध पद्धतीने होतो. काही व्यक्तींना जेनेटिक स्वरूपात कॅन्सर होतात. अशा पद्धतीने कॅन्सर झाल्यास त्यावर कोणताही उपाय करता येत नाही. तसेच कितीही उपचार केले तरीही त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. मात्र आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला असलेल्या काही सवयी देखील धोकादायक असतात. सुरुवातीला या सवयी चांगल्या वाटतात मात्र हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागतात. या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कॅन्सर बळावतो आणि मृत्यू देखील होतो. त्यामुळे आज या बातमीमधून रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कॅन्सरपासून दूर राहिले पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कॅन्सरपासून दूर राहिले पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Cancer treatment effects on fertility: कॅन्सरच्या उपचारपद्धतींमुळे महिला-पुरुषांना वंध्यत्वाचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकी कारणं सांगितली!

स्मोकिंग

धूम्रपान आजकाल प्रत्येक व्यक्ती करताना दिसत आहे. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील धूम्रपान करतात. सतत स्मोकिंग केल्याने यातील घातक धूर आपल्या घशाला, अन्ननलिकेला आणि फुप्फुसांना निकामी करतो. स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींना घशाचा कॅन्सर होतो. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आजपासूनच ही वाईट सवय सोडून द्या.

दारूचे सेवन

दारू आपल्या शरीरासाठी घातक आहे. कधीतरी वर्षातून एकदा दारू पिणे नॉर्मल आहे. मात्र काही व्यक्ती दररोज दारू पितात. काही व्यक्ती तर फक्त दारूवर जगतात. ही सवय अत्यंत वाईट आहे. याने लिव्हर पूर्णतः खराब होते. तसेच कालांतराने कॅन्सर सारखा भयंकर आजार लागतो. त्यामुळे आजपासूनच दारू पिणे सोडून द्या.

आहार

दारू आणि सिगारेट न पिणाऱ्या व्यक्तींना देखील कॅन्सर होतो. याचे कारण म्हणजे त्या व्यक्ती रेड मिट, फास्ट फूड आणि जास्त साखर असलेले पेय पितात. याने त्यांचे वजन वाढत जाते. वजन जास्त प्रमाणात वाढल्याने कालांतराने या व्यक्तींना रक्ताचा कॅन्सर देखील होतो. त्यामुळे आहारात पालेभाज्या, कडधान्य यांचे जास्त सेवन केले पाहिजे.

व्यायामाचा अभाव

काही व्यक्ती जास्त प्रमाणात लठ्ठ असतात. वयापेक्षा आणि उंचीपेक्षा जास्त प्रमाणात अंगावर चरबी असल्यास त्याने देखील कॅन्सर होतो. काही व्यक्ती ऑफिसच्या कामामुळे तासंताच एकाच जागी बसून काम करतात. वर्क फ्रॉम होम असल्याने अनेक व्यक्तींच्या शरीराची अजिबात हालचाल होत नाही. परिणामी त्यांना डायबिटीज सारखे आजार उद्भवतात. तसेच कॅन्सर देखील होतो.

वायु प्रदूषण

काही लहान मुलांना, महिलांना आणि धूम्रपान अजिबात करत नसलेल्या व्यक्तींना देखील कॅन्सर होतो. याचे कारण म्हणजे वायू प्रदूषण. व्यक्ती स्वतः जरी धूम्रपान करत नसले तरी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास फिरल्याने देखील कॅन्सर होतो. सिगारेटचा धूर नाकातोंडात गेल्याने कॅन्सरची भीती असते.

रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कॅन्सरपासून दूर राहिले पाहिजे याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Breast Cancer: घट्ट ब्रा घातल्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो? डॉक्टरांनी दिलं खरं उत्तर पाहा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com