स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा धोकादायक आणि गंभीर आजार मानला जातो. हा आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर हा जगभरात चिंतेचा विषय बनलाय. दरवर्षी अनेक लोक या गंभीर आजाराला बळी पडतात, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशात, याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती महिना पाळला जातो.
ब्रेस्ट कॅन्सरबाबत अनेक समज आहे, यामध्ये काळ्या रंगाची किंवा घट्ट ब्रा घातल्याने कॅन्सर होतो, यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये किती सत्यता आहे, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.
साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन, डॉ. डॉ तेजल गोरासिया यांनी सांगितलं की, अनेकांना असं वाटतं की, घट्ट ब्रा घातल्याने स्तनाचा आकार वाढतो. याशिवाय स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. ब्रा घालणं किंवा न घालणं याचा स्तनाचा कर्करोग होण्याही कोणताही विशिष्ट संबंध नाही. याबाबत कोणत्याही संशोधनात ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
काही संशोधनात असंही आढळून आलंय की अंडरवायर ब्रा लिम्फमधील रक्त परिसंचरणात अडथळा आणू शकते आणि यामुळे ब्रेस्टचा कॅन्सर होऊ शकतो. ब्रा घालून झोपायचं की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. अंडरवायर ब्रा किंवा खूप घट्ट ब्रा घातल्याने स्तनातील लिम्फच्या रक्ताभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही डॉ. तेजल यांनी सांगितलंय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काळी ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो असाही एक समज आहे. मात्र ‘हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार, काळ्या ब्राचा ब्रेस्ट कॅन्सरशी कोणताही संबंध नसून या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत.
खराब आहार, लठ्ठपणा आणि वाईट जीवनशैली याशिवाय अनुवांशिक कारणांमुळेही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. रेडिएशन आणि जास्त मद्यपानामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
ब्रेस्ट कॅन्सर हा शरीरातील पेशींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो. बहुतेकदा ब्रेस्ट कॅन्सर हा आनुवंशिकता आणि जीवनशैलीच्या निवडीमुळे होतो. यासाठी जबाबदार असणारे घटक म्हणजे वाढते वय, वैद्यकीय इतिहास, अनुवांशिक उत्परिवर्तन, धूम्रपान, मेनोपॉज, मद्यपान,हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, लहान वयात मासिक पाळी येणं इत्यादी असू शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.