Cancer Prevention saam tv
लाईफस्टाईल

Cancer Prevention : कर्करोगाचा धोका कमी करणारे ५ मसाले; रोजच्या जेवणात नक्की करा समावेश

Immunity Boost : भारतीय मसाले केवळ चव वाढवत नाहीत, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. हे मसाले कर्करोगाचा धोका कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांना नेहमीच एक खास स्थान आहे. ते केवळ अन्नाची चव वाढवण्याचे काम करत नाहीत, तर आपल्या आरोग्यासाठीही अमूल्य योगदान देतात. शिवाय मसाल्याशिवाय भारतीय जेवणाला चवच नसते. अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की काही मसाले गंभीर आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जर हे मसाले दैनंदिन आहारात समाविष्ट केले, तर कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. हे मसाले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे शरीर अनेक आजारांशी लढण्यास सक्षम होते.

हळद हा सर्वात प्रभावी मसाल्यांपैकी एक आहे. हळदीमुळे शरीरातील जळजळ नैसर्गिकरित्या कमी होते आणि ऑक्सिडेटिव्ह ताणही घटतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका जवळजवळ नगण्य होऊ शकतो. भारतीय स्वयंपाकात हळदीचा वापर सर्वसाधारणपणे होतोच, परंतु तिचे सेवन योग्य प्रमाणात आणि नियमित करणे अधिक फायदेशीर ठरते.

काळी मिरी कर्करोग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यात असलेले ‘पाइपरिन’ हे संयुग रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ कमी करते. परिणामी, गंभीर आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.

लसूण हे आणखी एक आरोग्यदायी मसालेदार घटक आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असून, ते शरीरातील जळजळ कमी करण्याबरोबरच उपचार प्रक्रियेला गती देतात. विशेषतः लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी लसूण अतिशय फायदेशीर मानले जाते. जिरे पचन सुधारण्यासाठी ओळखले जाते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुण पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि शरीरातील हानिकारक बदलांना थांबवतात.

याशिवाय, मेथीच्या दाण्यांचे पाणी पिणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी ते पिण्याने रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. संशोधनात असे आढळले आहे की मेथीचे दाणे स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांमध्येही फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT