15 August Speech
Independence Day 2025saam tv

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेली प्रगतीची मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

15 August Speech : १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. शाळेतील मुलांसाठी सोप्या आणि प्रभावी भाषणाचा नमुना येथे दिला आहे.
Published on

येत्या १५ ऑगस्टला मुलांना शाळेत भाषण द्यायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. पुढे तुम्हाला सोप्या शब्दात आणि प्रभावीपणे १५ ऑगस्टचे भाषण दिले आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत आपला ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करणार आहे. देशभरात या ऐतिहासिक दिवसाच्या तयारीला वेग आला असून शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये झेंडावंदन सोहळ्यांची आखणी सुरू झाली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ हा तो सुवर्णक्षण होता, जेव्हा भारताने ब्रिटिशांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून मुक्त होत स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. या दिवशी सर्व धर्म, जाती, प्रांत आणि संस्कृतींचे लोक एकत्र येऊन देशभक्तीचा उत्सव साजरा करतात. स्वातंत्र्य दिन हा केवळ आनंदाचा दिवस नसून तो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक संघर्ष, त्याग आणि दृढनिश्चयाची आठवण करून देणारा प्रसंग आहे.

15 August Speech
Monday Horoscope : सोमवार जाणार ४ राशींसाठी लाभाचा, बढतीचे योग आणि कटकटी मिटणार

शतकानुशतके चाललेल्या बलिदानाच्या कहाण्यांमुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकावतील आणि देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सलग १२व्यांदा या ऐतिहासिक व्यासपीठावरून जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणातून देशाच्या प्रगतीचा आढावा, आगामी योजना आणि राष्ट्राच्या ऐक्याचा संदेश दिला जाण्याची अपेक्षा आहे.

राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यांवर तिरंग्यांच्या लहरी, देशभक्तीची गाणी आणि उत्साही घोषणांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा भारत आपली एकता, सांस्कृतिक विविधता आणि प्रगतीचा संकल्प जगासमोर मांडणार आहे.

15 August Speech
WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट Whatsappवर, जाणून घ्या बुकींग स्टेप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com