Sakshi Sunil Jadhav
जर आपल्याला परदेशी भाषेचे आकर्षण असेल किंवा त्यामध्ये काही करिअर ची इच्छा असेल तर आज त्या गोष्टीला चालना मिळेल. परदेशी वार्तालाप होतील.
आनंद लुटायला आपल्याला आवडते. आज कामाच्या बरोबर मनोरंजनात्मक कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्याल, आपल्या बॉसची मर्जी सुद्धा सांभाळाल.
आज श्रावणी सोमवार. शिव उपासना, विष्णू उपासना आपल्या राशीला फलदायी ठरेल. काहीतरी चांगल्या बातम्या कानावर येतील.
कोणत्याही गोष्टीचे आवडंबर आज माजवू नका. मागे बघू नका. एकाच रस्त्याने आणि नेक दिलाने काम करा.
जोडीदारराच्या मागण्या काय आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये आज वेळ घालवला तरी चालेल. रखडलेले कोर्टाच्या कामात आज यश मिळेल.
कोणतीतरी प्रेरणा घेऊन आज कामे कराल. नोकरीच्या ठिकाणी सुलभता जाणवेल. खंबीरपणे आव्हाने पेलाल.
लक्ष्मीची भरभराट आपल्या द्वारी आज होणार आहे. ठरवून गेलेल्या गोष्टींमध्ये यश मिळेल.
प्रेमस्वरूप आईचे वात्सल्य मिळेल. वास्तू आणि वाहनसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कुटुंबीयांच्या सहकार्याने आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा आज पार पाडाल.
महत्त्वाच्या पत्रव्यवहाराला आज मार्ग मिळतील. घटना सुलभ आणि सुकर होताना आज जाणवून येईल.
व्यवसायाच्या उलाढालीमध्ये व्यस्त रहाल. पैसा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कधी आपण म्हणतो कंजूस व्यक्ती लक्ष्मीला आवडते हेच खरे.
ऐटीत आणि मजेत जगण्याची स्वप्न सत्यात सुद्धा येतील. स्वतःपेक्षा जगात काही महत्त्वाचे नाही आज हे जाणवेल.
विनाकारण बिकट अवस्था होईल. साधेपणामुळे केलेल्या गोष्टींचा आज त्रास वाटेल. महत्त्वाच्या बैठक आणि निर्णय पार पडतील.