Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना वाढवणं जितकं सोपं वाटतं तितकं ते नसतं.
लहान मुलांना सगळ्या गोष्टी समजावून पुन्हा पुन्हा शिकवाव्या लागतात.
पालक लहानपणी जे शिकवतात त्याच्यावर मुलांचे भविष्य अवलंबून असते.
काही पालक मुलं ऐकत नसेल तर ओरडतात किंवा मारतात. या वागण्याने लहान मुलांवर काय परिणाम होतो जाणून घ्या.
जर तुम्ही मुलांना प्रत्येक गोष्टीवर मारत किंवा ओरडत असाल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तसेच मुलं कोणाशीही बोलत नाहीत.
बऱ्याच वेळेस सगळ्या गोष्टींवर मुलांना ओरडत असाल तर मुलं चिडचिड करायला लागतात. हाच त्यांचा स्वभाव होतो.
पालक मुलांना मारत असतील तर मुलं मोठ्यांना वाईट समजतात. तसेच कोणचाही आदर करत नाहीत.
जर पालक लहान मुलांना मारत असतील तर ते सुद्धा त्यांचा भावंडांना किंवा मित्रांना मारायला सुरुवात करतात.