Independence Day Special Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Independence Day Special Recipe : स्वातंत्र्य दिन साजरा करताना घरच्याघरी बनवा तिरंगा पुलाव; वाचा सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी

Special Recipe : तुम्ही सुद्धा विविध पदार्थ चाखणारे खवय्ये आहात आणि जेवण बनवण्याची तुम्हाला आवड असेल तर आम्ही आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी आणली आहेत.

Ruchika Jadhav

स्वातंत्र्य दिन असल्याने अनेक व्यक्तींना सुट्टी आहे. सुट्टी म्हटल्यावर व्यक्ती बाहेर फिरण्याचा प्लान करतात. तर काही जण घरच्याघरी काही सुंदर आणि चविष्ट पदार्थ कसे बनवायचे याची रेसिपी ट्राय करतात. आता तुम्ही सुद्धा विविध पदार्थ चाखणारे खवय्ये आहात आणि जेवण बनवण्याची तुम्हाला आवड असेल तर आम्ही आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी आणली आहेत.

आज आपण तिरंगा पुलाव कसा बनवायचा याची माहिती जाणून घेणार आहोत. तिरंगा पुलाव बनवण्यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार? तसेच याची कृती काय आहे? या सर्वांची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

बास्मती तांदूळ

तेल

जीरे

मोहरी

हळद

भाज्या

मीठ

गरम मसाला

रंग

खडे मसाले

कांदा

लाल तिखट

लसूण

अद्रक

कृती

अगदी थोडे साहित्य वापरून सुद्धा आपण सुंदर पुलाव बनवू शकतो. त्यासाठी आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात तेल तापण्यासाठी ठेवा. या तेलात थोडे जिरे आणि तेजपत्ता टाका. त्यानंतर यात धुतलेला तांदूळ मिक्स करा. पाणी आणि मीठ टाकून हा तांदूध छान तयार होण्यासाठी ठेवा.

तांदूळ शिजत असताना या पाण्याला उकळी येऊ द्या. तांदळाच्या पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर सर्व तांदूळ पाण्यातून बाहेर काढा आणि एका टोपलीत ठेवा. यातील सर्व पाणी निघून जावे यासाठी तुम्ही लाकडी टोपल्याचा सुद्धा वापर करू शकता.

आता फोडणीची तयारी करा. सर्वात आधी एक लसूण आणि अद्रक यांची पेस्ट करा. त्यानंतर एक कांदा घ्या. कांदा उभा चिरून तो देखील गॅसवर फ्राय करून घ्या. त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करा. भाज्यांमध्ये शिमला मिरची, फरसबी, गाजर, बटाटा आणि फ्लॉवर तुम्ही मिक्स करू शकता.

भाज्यांना छान वाफ लागली की यात मीठ, हळद आणि गरम मसाला तसेच मिरची किंवा लाल तिखट मिक्स करा. पुढे हे सर्व शिजवून घ्या. त्यानंतर एका टोपात केशरी रंग घ्या आणि त्यात थोडा भात मिक्स करा. पुढे हिरवा रंग मिक्स करून थोडा भात तयार करा. आता सर्व भाज्या आणि रंगाचा भात तिरंग्याच्या आकारात लावून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttan Virar Sea Link: नरिमन पॉईंट ते विरार फक्त एका तासात; कोस्टल रोडच्या कामाला हिरवा झेंडा | VIDEO

Nitesh Rane : "दिपक केसरकर हमारे साथ..." प्रचारसभेत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, कोकणातल्या राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

SCROLL FOR NEXT