ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रताळे, मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, तूप.
उपवास स्पेशल भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये उकडून घ्या.
त्यानंतर रताळे थोडे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढा. रताळ्याचे बारीक तुकडे करून काही वेळ तसेच ठेवून घ्या.
त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये फोडणी तयार करा.
गरम तुपात जिरं टाकून त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार करा.
नंतर त्यात उकडलेली रताळी टाकून सर्व मिक्स करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर टाकून मिक्स करून घ्या.
तुमची सोप्या पद्धतीची श्रावणी स्पेशल हेल्दी आणि टेस्टी रताळ्याती भाजी सर्व्ह करा.