Veg Pulav Recipe : हॉटेलसारखा व्हेज पुलाव घरीच बनवा, रेसिपी पाहा

कोमल दामुद्रे

भात

भाताचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पण झटपट पण टेस्टी भात बनवायचा असेल तर व्हेज पुलाव ट्राय करु शकता.

रेसिपी

हॉटेलसारखा व्हेज पुलाव घरीच बनवायचा असेल तर सोपी रेसिपी पाहा.

साहित्य

बासमती तांदूळ-१ कप, तूप -२ चमचे, मिक्स भाज्या - १ कप, चिरलेला कांदा- १ कप, मीठ, लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे, तमालपत्र दालचिनी लवंग- १ ते २

बासमती तांदूळ

जर तुम्हाला हॉटेलसारखा पुलाव घरीच बनवायचा असेल तर सगळ्यात आधी बासमती तांदूळ पाण्यात भिजवा.

तूप गरम करा

कढईत तूप गरम करुन त्यात जिरे, दालचिनी, लवंगा, तमालपत्र इत्यादी टाका.

कांदा लालसर होऊ द्या

त्यात चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.

भाज्या

नंतर त्यात कोबी, मटार, गाजर, बीन्स घालून शिजवून घ्या.

मीठ-मसाले

भाज्यांमध्ये मीठ-मसाले घालून चांगले शिजल्यावर पाणी काढून टाका.

भात शिजवून घ्या

आवश्यकतेनुसार पाणी घालून भिजवलेला बासमती तांदूळ घालून शिजवून घ्या.

व्हेज पुलाव

तयार आहे टेस्टी आणि झणझणीत व्हेज पुलाव

Next : उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने काय होते?

Tea Side Effects | Saam tv
येथे क्लिक करा