कोमल दामुद्रे
चहा सगळ्यांना अधिक प्रमाणात प्यायला आवडतो. उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला हानी होते
जाणून घेऊया उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?
ऋतूमानानुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात गरम पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.
उन्हाळयात जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जास्त चहा प्यायल्याने शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. यामुळे चेहरा कोरडा पडतो.
उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला हानिकारक ठरु शकते. यात असणाऱ्या कॅफिनमुळे छातीत जळजळ होऊ शकते.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी चहा पुरेशा प्रमाणात प्यावा. जास्त चहा प्यायल्याने निद्रानाशाची समस्या होऊ शकते.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने वारंवार लघवी होण्याची समस्या होते.
तणाव कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे.