कोमल दामुद्रे
उन्हाळ्यात बाजारात आपल्याला अनेक फळे दिसतात. जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
त्यापैकी एक म्हणजे ताडगोळा. Ice Apple Fruit नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यात खूपच जास्त प्रमाणात बाजारात दिसून येते.
त्वचेवर रॅश, खाज, घामोळ्यांवर हे फळ रामबाण आहे. यामुळे त्वचाही चांगली राहते.
ताडगोळ्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. यामध्ये कॅलरीज कमी असून विटामिन बी, सी, ई, के जास्त प्रमाणात आढळते.
ताडगोळ्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला हायड्रेट राहाण्यास मदत होते.
पोटामध्ये जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचे सेवन करावे. यात असणारे पोषक तत्व आणि मिनरल्स पोटातील जळजळ कमी करतात.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.
याचे सेवन केल्याने भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.