Kidney failure warning signs SAAM TV
लाईफस्टाईल

Kidney failure warning signs: शरीरात हे मोठे बदल दिसले तर समजा किडनी फेल होणारे; डॉक्टरांनी स्पष्ट केली लक्षणं

kidney disease symptoms: शरीरात काही मोठे बदल दिसू लागले तर ते किडनी निकामी होण्याचे संकेत असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, किडनी शरीरातील टॉक्सिन द्रव्यं बाहेर टाकण्याचं आणि रक्त शुद्ध करण्याचं महत्त्वाचं काम करते.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर काढणं हे किडनीचं प्रमुख काम असतं. मात्र यामध्ये कोणताही बिघाड झाला की त्याची लक्षणं तुमच्या शरीरात दिसून येतात. किडनीच्या कोणत्याही समस्या शक्यतो कोणतीही लक्षणं न दाखवता सुरु राहतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किडनीच्या समस्येची कोणतीही लक्षणं दिसून येत नसल्याने निदान उशीरा होतं. त्यामुळे त्यावर उपचार होण्यासही उशीर होतो. मात्र जर तुम्ही ही लक्षणं वेळेत ओळखली तर किडनी फेल होण्यापासून वाचवता येते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोणतंही कारण नसताना पाय, घोटे, चेहरा किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येणं हा किडनीच्या त्रासाचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. हेल्दी किडनी शरीरातील जास्तीचं मीठ आणि पाणी बाहेर टाकते. पण ही प्रक्रिया हळू झाली की द्रव शरीरात साचू लागतं. यामुळे सूज येऊ लागते.

लघवीमध्ये बदल होणं

लघवीमध्ये होणारे बदल हे किडनीशी संबंधित सर्वात महत्त्वाचे संकेत मानले जातात. यावेळी लघवीमध्ये खालील बदल दिसून येऊ शकतात.

  • रात्री विशेषतः वारंवार लघवी लागणं

  • लघवी खूप गडद दिसणं

  • लघवीला फेस दिसणं

  • लघवीत रक्त दिसणं

  • लघवी करताना जळजळ होणं

रक्तदाब अचानक वाढणं

तरूण व्यक्ती अनेकदा वाढलेल्या रक्तदाबाकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते किडनीच्या समस्येमुळे असू शकतं. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम किडनी करते. किडनी खराब झाल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

सततचा थकवा

नेहमीपेक्षा जास्त थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. किडनी नीट टॉक्सिन घटक गाळू शकत नसल्याने ते रक्तात साचून राहतात. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि थकवा, डोकं जड वाटणं अशी लक्षणं दिसतात.

भूक कमी होणं

शरीरात धोकादायक द्रव्यं साचल्याने पचनक्रिया आणि भूक यावर परिणाम होतो. मळमळ, उलट्या, भूक कमी होणें, तोंडात धातूसारखी चव येणं अशी लक्षणं पाहायला मिळतात. सुरुवातीला ही लक्षणं सौम्य वाटू शकतात पण किडनीची कार्यक्षमता कमी होत गेली की ती अधिक तीव्र होतात.

मुलांमधील किडनीच्या समस्येची लक्षणं

  • वाढ खुंटणं

  • वारंवार युरीन इन्फेक्शन होणं

  • वारंवार अंथरुण ओलं करणं

  • पायांच्या हाडांमध्ये विकृती दिसणं

कोणत्या व्यक्तींना जास्त धोका

  • मधुमेह

  • उच्च रक्तदाब

  • हृदयविकार

  • लठ्ठपणा

  • कुटुंबातील लोकांना किडनीच्या समस्या असणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT