High cholesterol pain symptoms saamtv
लाईफस्टाईल

High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा धमन्यांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; हार्ट अटॅक येण्यापूर्वीच उपाय करा

cholesterol symptoms in arteries: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या सर्वत्र दिसून येते. धमनींमध्ये कोलेस्टेरॉल साचल्यामुळे रक्तप्रवाह अडथळा निर्माण होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार मागे लागलेत. यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखी घटक असतो. शरीरात जास्त प्रमाणात वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगते की, कोलेस्ट्रॉल वाईट नाही पण त्याचं प्रमाण जास्त झालं तर ते धोकादायक ठरतं.

LDL कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास वाढतात धोके

रक्तात LDL कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ही स्थिती अचानक होते आणि सुरुवातीला मोठी लक्षणं दिसत नाहीत. हाय कोलेस्ट्रॉलची थेट लक्षणं दिसत नसली तरी काही अप्रत्यक्ष इशारे दिसू शकतात.

LDL कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं

छातीत वेदना

ज्यावेळी LDL कोलेस्टेरॉलमुळे कोरोनरी धमन्यांमध्ये प्लाक जमा होतो तेव्हा छातीत वेदना होतात. या धमन्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. धमन्या अरुंद झाल्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे छातीत दाब, जडपणा, ताण किंवा जळजळ जाणवते. ही वेदना हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत जाऊ शकते.

त्वचेवर झॅन्थोमा

झॅन्थोमा म्हणजे त्वचेखाली तयार होणारे पिवळसर, मेणासारख्या गाठी किंवा डाग. हे LDL कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येतात. हे डाग प्रामुख्याने डोळ्यांच्या पापण्यांवर, बोटांच्या सांध्यांवर, कोपर, गुडघे यांच्यावर दिसून येतात. यावर उपाय म्हणून आहारात बदल करावा.

श्वास घेण्यास त्रास होणं

LDL जास्त झाल्यामुळे धमन्यांची क्षमता कमी होते. ज्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि शरीराला ऑक्सिजन पोहोचवणं कठीण होतं. यामुळे जिने चढताना, वेगाने चालताना किंवा अगदी झोपल्यावरही श्वास घेण्यास त्रास होतो. यावेळी फुफ्फुसामध्ये द्रव साचल्यामुळे घरघर, धाप लागणं किंवा वेगाने श्वास घेणं अशी लक्षणं दिसतात.

पायात वेदना होणं

पायात वेदना किंवा गोळे येणं हे LDL प्लाकमुळे पायांच्या धमन्या बंद झाल्यामुळे होतं. हे प्रामुख्याने पोटऱ्या, मांडी किंवा कंबरेमध्ये जाणवतं. चालताना स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे वेदना होतो.

सततचा थकवा

उच्च LDL मुळे रक्तप्रवाह कमी होतो. ज्यामुळे स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन नीट मिळत नाही. यामुळे सततचा थकवा जाणवू लागतो. यामुळे तुम्हाला झोप येत नाही आणि परिणामी थकवा येऊ लागतो. हा थकवा दररोज जाणवतो आणि व्यायाम किंवा दैनंदिन कामांमध्ये उत्साह कमी होतो.

स्मरणशक्ती कमी होणं

LDL प्लाकमुळे हृदयाच्या धमन्या अरुंद होऊन मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते. इतकंच नाही तर शब्द आठवण्यात देखील अडचण येते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

वाळू माफियांची दादागिरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर | VIDEO

Snowfall : निसर्गाचा प्रकोप! भीषण बर्फवृष्टीमुळे ६१ जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

SCROLL FOR NEXT