Face And Liver Connection saam tv
लाईफस्टाईल

Liver Health: चेहऱ्यावर ही ६ लक्षणं दिसली तर समजा लिव्हर होतंय खराब; फॅटी लिव्हरचाही धोका असू शकतो

Face And Liver Connection: लिव्हर हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे जो पचनक्रिया, रक्त शुद्धीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र लिव्हर खराब होऊ लागल्यास त्याची लक्षणं शरीरावर दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील अनेक अवयव आपल्याला आरोग्याबद्दल माहिती देत असतात. डोळ्यांखाली डार्क सर्कल असोत किंवा गालावर लालसरपणा असो. या गोष्टी आपल्याला तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाल्याचं सांगतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चेहऱ्यावरील बदल हे लिव्हरच्या समस्यांचं लक्षण असू शकतात. यावेळी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

डार्क सर्कल

पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर डार्क सर्कल कमी होत नसतील तर यामागे लिव्हरची समस्या दडलेली असू शकते. डॉक्टरांनी स्पष्ट केलंय की, लिव्हर शरीरातील टॉक्सिन पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करत नाही तेव्हा त्यामुळे टॉक्सिन पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे थकवा वाढू शकतो आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. परिणामी डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ शकतात.

गालांवर लालसरणार येणं

गालांवर अचानक किंवा असामान्य लालसरपणा येणं हे धोकादायक असू शकतं. तज्ज्ञांच्या मते लिव्हरचं योग्य काम न झाल्यामुळे इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढू लागतं. ज्यामुळे गालांवर लालसरपणा येतो. ही समस्या वाढल्यास फॅटी लिव्हरमध्येही रूपांतरीत होऊ शकते.

खाज येणारी पुरळ

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खाज येणारे पुरळ आले असतील तर ते त्वचेची समस्या आहे असं समजू नका. हे त्वचेखाल्या पित्तात क्षार जमा झाल्यामुळे किंवा आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे असू शकतं. जे लिव्हरच्या समस्येचं लक्षण असू शकतं.

कावीळ

त्वचा किंवा डोळे पिवळे होणं ही लिव्हरची एक सामान्य समस्या आहे. हे बिलीरुबिन नावाच्या वेस्ट प्रोडक्ट जमा झाल्यामुळे होतं. ही प्रक्रिया यकृतात घडते. कावीळ हे फॅटी लिव्हर किंवा इतर गंभीर लिव्हरच्या रोगाचं संकेत देऊ शकतं.

चेहऱ्यावर सूज येणं

चेहऱ्यावर सूज येणं हे लिव्हरच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी यकृत शरीरातील द्रवपदार्थाचं संतुलन राखू शकत नाही तेव्हा पाणी साचू लागतं. परिणामी चेहऱ्यावर सूज येते.

चेहऱ्यावर सूज येणं

चेहऱ्यावर सूज येणं हे लिव्हरच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी यकृत शरीरातील द्रवपदार्थाचं संतुलन राखू शकत नाही तेव्हा पाणी साचू लागतं. परिणामी चेहऱ्यावर सूज येते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT