Bharat Jadhav
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त रडायला येत असते. पुरुष देखील रडत असतात, पण महिलांच्या डोळ्यांतील अश्रू लागलीच गालावर ओघळतात.
महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक भावनाशील आणि इमोशनल असतात.
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त का रडू येते याबाबत वर्ष २०११ मध्ये एक संशोधन करण्यात आले आहे.
एक महिला संपूर्ण वर्षभर ३० ते ६४ किंवा यापेक्षा जास्त वेळा रडते.
महिला सार्वजनिक ठिकाणी देखील रडू लागतात.
पुरुष सार्वजनिक ठिकाणी रडणं टाळतात. ते एकांतात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असतात.
पुरुष संपूर्ण वर्षभरात पाच ते सात वेळा रडतात.
महिला आणि पुरुषांमध्ये असा बदल असण्यामागे हार्मोन्सचं कारणीभूत असते. या हार्मोन्सचे नाव टेस्टोस्टेरोन आहे.
संशोधनानुसार पुरुषांमध्ये अशा प्रकारचे हार्मोन्स आहे जे त्यांना महिलांच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आणि मजबूत बनवत असतात.
हे हार्मोन्स पुरुषांमधील लैगिंक गतिविधींना संचालित करत असतात. हे हार्मोन्स पुरुषांना रडणे किंवा भावनिक होण्यापासून रोखत असते.