प्रजनन उपचार करणाऱ्या कोणत्याही जोडप्यासाठी किंवा व्यक्तीसाठी गर्भधारणापूर्वी त्याचे योग्य नियोजन करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमच्या गर्भधारणेतील प्रवासासाठी तुमचं शरीर, मनाची तयारी करण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे यशस्वी गर्भधारणा आणि निरोगी बाळाची शक्यता वाढवतं. या कालावधीत घ्यायची काय पूर्व तयारी केली पाहिजे यासंदर्भात पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीमधील प्रजनन सल्लागार डॉ निशा पानसरे यांनी मार्गदर्शन केलंय.
गर्भधारणेपुर्वी जोडप्याने वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि शक्यतो अनुवांशिक तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. प्रजनन क्षमता किंवा गर्भधारणेवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही आरोग्य समस्येचं वेळीच निदान करणं गरजेचं आहे. या समस्या लवकर दूर केल्याने प्रजनन उपचारांची परिणामकारकता सुधारता येतं. पॅप स्मीअर आणि मॅमोग्राम तपासणी अद्ययावत असल्याची खात्री करा.
स्त्रियांमधील स्त्रीबीजाचं प्रमाण व त्याचं मूल्यांकन करण्यासाठी चाचण्यांचा समावेश असू शकतो, जसे की अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) चाचणी, फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH) चाचणी आणि अंडाशय आणि गर्भाशयाचे मूल्यांकन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड. या चाचण्या तुमच्या स्त्रीरोगतज्ञाद्वारे केल्या जाऊ शकतात. पुरुषांनी शुक्राणूंची संख्या, गतिशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी वीर्य विश्लेषणाचा विचार केला पाहिजे. हे मूल्यांकन सर्वात योग्य प्रजनन उपचार योजना तयार करण्यात मदत करतात.
शरीराचे वजन प्रजनन क्षमतेवर लक्षणीय परिणाम करते. कमी वजन किंवा जास्त वजनामुळे स्त्रियांमध्ये हार्मोन्सची पातळी आणि ओव्हुलेशन आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी वजन मिळवणे आणि वजन नियंत्रित हे राखणे गर्भधारणेची शक्यता सुधारते आणि निरोगी गर्भधारणेस मदत करते
प्रजननक्षमतेमध्ये पोषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फळे, भाज्या, तृणधान्य, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स तुमची प्रजनन क्षमता वाढवू शकतात. फॅालिक ऍसिड, झिंक, सेलेनियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड यासारखे काही पोषक घटक विशेष फायदेशीर ठरतात. प्रजनन आरोग्य चांगले राहण्याकरिता योग्य आहाराविषयक मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रसुतिपूर्व जीवनसत्वाचे सेवन करण्यास सुरू करा.
कॅफीनचे जास्त सेवन हे धूम्रपान, अल्कोहोल हे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक करतात. हे पदार्थ विकसनशील गर्भालाही हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे गर्भधारणेच्या पूर्व काळात आणि संपूर्ण गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन टाळणे योग्य राहिल.
तणाव व्यवस्थापन हा अनेकदा दुर्लक्षित केलेला पैलू आहे. उच्च तणाव पातळी ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय आणू शकते आणि शुक्राणूंची गुणवत्ता कमी करू शकते. ॲक्युपंक्चर, योग, ध्यान, समुपदेशन यासारखी तंत्रे तणावाची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.
काही औषधे तुमच्या प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकतात. याकरिता विशेष वैद्यकीय सल्ला घ्या सुरु असलेली औषधे आणि सप्लिमेंट्सचे योग्य आहेत का याची खात्री करा जेणेकरून ते ग्भधारणेवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही.
कीटकनाशके, सॉल्व्हेंट्स आणि ठराविक धातू आणि रसायनांच्या संपर्कात आल्याने प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. शक्य असेल तर सेंद्रिय पदार्थ निवडून, नैसर्गिकरिकत्या तयार केलेली स्वच्छतेची उत्पादने वापरा
प्रजनन उपचार महाग असू शकतात त्यामुळे आर्थिक भार येऊ शकतो. योग्य वेळी आर्थिक नियोजन तुम्हाला उपचार, औषधे आणि एग्ज किंवा स्पर्म फ्रिजींगसारख्या पर्याय निवडण्यासाठी फायदेशीर ठरेल.
प्रजनन उपचार हे भावनिकदृष्ट्या परिणाम करणारे असू शकतात. प्रजनन प्रवासाशी परिचित असलेल्या समुपदेशक, ऑनलाइन समुदायांकडून मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करा. या प्रक्रियेसाठी भावनिकदृष्ट्या तयारी करा
प्रजनन उपचारांकरिता वारंवार डॉक्टरांची भेट घेणे, रक्त तपासणी आणि गर्भधारणेचे निरीक्षण आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.