Saree Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Saree Tips : पावसात साडी नेसल्यावर छत्री घेऊन कसं चालायचं? महिलेने थेट करूनच दाखवलं, पाहा VIDEO

How To Walk In a Rain Holding Saree? : भर पावसात साडी नेसली की चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अतरंगी गोष्टी पहायला मिळतात. अशात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा अनेक व्यक्तींना आवडत नाही. त्यात महिलांना तर बऱ्याच अडचणी येतात. विशेष म्हणजे भर पावसात साडी नेसली की चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

करिश्मा असं या वहिनीचं नाव आहे. या महिलेने महिलांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या टास्कवर सिंपल उपाय शोधून काढले आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

पावसात साडी नेसून छत्री कशी पकडायची? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. कारण साडीच्या मिऱ्या एका हाताने पकडव्या लागतात त्यामुळे पदर मागच्या मागे भिजून जातो. त्यामुळे एका हाताने पदर कमरेवर खोचून घ्या. नंतर साडीच्या मिऱ्या अलगद हातात पकडा आणि छत्री दुसऱ्या हातात पकडा, असं या महिलेने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

इतकंच नाही तर या महिलेने यावर चालून सुद्धा दाखवलं आहे. आता या महिलेचा हा रिल व्हिडिओ महिलांना प्रचंड आवडला असून व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. करिश्मा यांच्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट देखील आल्या आहे. करिश्मा यांचं इंस्टाग्रामला सारी फॅशनचं एक अकाऊंट आहे.

यावर त्यांनी साडी आणि ती नेसल्यावर महिलांना येणाऱ्या काही अडचणींवर उपाय सांगितले आहेत. या आधी साडी नेसल्यावर बसमध्ये कसं जायचं. ट्रेनने प्रवास करताना साडी कशी होल्ड करायची असे अनेक सिंपल व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टा अकाऊंटला पोस्ट केलेत.

त्यांचा पावसाळ्यातील साडीचा रिल व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेक रील व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणी आणि महिलांनी यावर सुद्धा स्वतःचा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर साडी आणि पावसाळा हा विषय ट्रेण्ड होताना दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आक्षेप - भुजबळ

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT