Aaditya Thackeray: मतदान केंद्राबाहेर असुविधा, अनेक तक्रारी; आदित्य ठाकरेंची X अकाउंटवर पोस्ट करत निवडणूक आयोगाला विनंती

Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबईमध्ये आज मतदान पार पडत आहे. परंतु अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर असुविधा आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधा नाहीत, तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. या समस्यांची दखल घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
आदित्य ठाकरे
Aaditya ThackeraySaam Tv

मुंबईमध्ये आज मतदान पार पडत आहे. परंतु अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर असुविधा आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधा नाहीत, तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत. या समस्यांची दखल घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय की, हा व्हिडिओ निवडणूक आयोगासाठी आहे. आज मुंबईत मतदान (Mumbai Lok Sabha Election 2024) होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून अनेक मुंबईकर रांग लावून तासनतास मतदान करण्यासाठी उभे आहेत. परंतु प्रश्न असा आहे की, आज मतदान केंद्रांवर सोईसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत. अनेक लोकांना उन्हामुळे चक्कर देखील आलेली आहे. पाण्याची सोय नाही, सावली नाही कुठेही पंखे लावलेले नाहीत. ही जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाची आहे. आम्ही तिथे काहीच करू शकत नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आम्ही (Aaditya Thackeray) प्रयत्न जरी केला तरी आमच्यावर केस होईल. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की, अनेक दिवसांपासून आपल्याला म्हणजे सर्वच मुंबईकरांना मतदान करा असं सांगितलं जात होतं. अनेक सिनेकलाकारांच्या माध्यमातून देखील मतदान करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र मतदान खूप कमी होत आहे. मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. अनेक बुथवर घड्याळ, मोबाईल सोबत ठेवायचा की नाही ठेवायचा? याबाबत संभ्रम आहे.

आदित्य ठाकरे
Mumbai Loksabha Voting: ओशिवरामध्ये भाजप-ठाकरे गट आमनेसामने, मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप

हे सगळे गोंधळ शेवटच्या मिनीटाला समोर येत आहेत. आता मतदान होण्यासाठी फक्त काही तास उरले आहे. मतदान नीट व्हावं यासाठी कृपया आपण मुंबईकरांची मदत करावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) केलं आहे. आपल्या सर्वांनाच मतदानाची गरज आहे. तो आपला अधिकार आणि हक्क आहे. मतदानाचा (Voting) टक्का नक्की वाढेल, पण त्यासाठी आपण मतदारांची मदत करा अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. हा व्हिडिओ त्यांनी आज दुपारी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर केला आहे.

आदित्य ठाकरे
Pune Voting: पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com