Intestinal Inflammation symptoms google
लाईफस्टाईल

Intestinal Inflammation: आतड्यांना सुजन येतेय, मग आहारात करा 'या' ५ पदार्थांचा समावेश, मिळतील अद्भूत फायदे

Intestinal Inflammation symptoms : तुम्ही जितकं घरचं अन्न खाल तितकं तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. तसेच पोट आणि आतड्यांमधील सुजन कमी होईल. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या संपुर्ण शरीरावर होऊ शकतो.

Saam Tv

आपल्या शरीरात दोन आतडे असतात. एक लहान आणि एक मोठे आतडे. हा भाग पचनसंस्थेचा एक महत्वाचा मानला जातो. निरोगी शरीरासाठी दोन्ही आतडे निरोगी असणे महत्वाचे असते. मात्र बऱ्याचदा आतडे सुजतात. याचं कारण म्हणजे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण असू शकतं. त्याचा परिणाम तुमच्या संपुर्ण शरीरावर होत असतो. त्याने पोटात जळजळ, अपचन, पोटात दुखणे अशी लक्षणे दिसतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वेळीच बदल केला आहे.

तुम्ही जितकं घरचं अन्न खाल तितकं तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. तसेच पोट आणि आतड्यांमधील जळजळ कमी होईल आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतील आणि वाईट नष्ट होतील. यासोबतच जास्त पाणी प्या आणि अन्न हळूहळू चावण्याची सवय लावा. फायबरयुक्त पदार्थ खा आणि तुमच्या आहारात अधिक प्रथिने असू द्या.

आतड्यात जळजळ होण्याची लक्षणे

अपचन

पोटफुगणे

पोटदुखी आणि पोटात पेटके येणे.

वारंवार शौचालय होत आहे असे वाटणे.

वजन कमी होणे.

उलटीसारखं वाटणे.

आतड्यांमधील जळजळ दूर करण्यासाठी उपाय

आतड्यांमधील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही आहारात, तुमच्या जीवनशैलीत बदल करणं महत्वाचं आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही पदार्थांचा समावेश केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे आतड्यांमधील जळजळ दूर होते. यासोबत हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.

दही आणि ताकाचे फायदे

दही आणि ताकामध्ये जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. त्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि आतडे निरोगी करतात. तसेच तुम्हाला सतत गॅस होत असेल. तर तुम्ही दही ताकाचे सेवन करू शकता.


कांदा आणि लसणाचे सेवन

जेवणात शक्यतो कांदा लसणाचा वापर जास्त प्रमाणात करा. विशेषत: कच्चा कांदा आणि लसूण जेवणासोबत काही दिवस कच्च खात राहा. दररोज सकाळी लसणाच्या पाकळ्या चावा. जेवणासोबत १ कच्चा कांदा खा. यामुळे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढतात. त्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि आतडे निरोगी करतात.

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले जीवनसत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. तसेच आतड्या निरोगी राहतात. पाचनक्रिया सुधारते. कारण त्यामध्ये फायबर, प्रीबायोटिक्स, अॅंटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

Rupees 2000 Note: 2000 नोटांबाबत मोठी अपडेट; अजूनही 6017 कोटी रुपयांच्या नोटा चलनात

नालासोपारा मनीलॉन्ड्री प्रकरणात ED ची मोठी कारवाई, ८ कोटींची रोकड आणि दागिने जप्त, नगररचना उपसंचालक अडचणीत|VIDEO

Maharashtra Live News Update : - शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही - भरत गोगावले

SCROLL FOR NEXT