Cervical Pain: लॅपटॉपच्या अती वापराने तरुणांना सर्व्हायकल पेनचा धोका; ओळखा लक्षणे आणि घरगुती उपाय

Neck Pain Home Remedies: सध्याच्या डिजीटल माध्यमांच्या युगात लोक लॅपटॉप, कंम्प्युटर, स्मार्टफोन अशा उपकरणांवर सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या मानेचं दुखणं वाढत चाललं आहे.
Neck Pain Home Remedies
Cervical Paingoogle
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांमध्ये Cervical Pain चा त्रास सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. हा त्रास पुर्वी वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून यायचा. आता या आजाराने तरुणांचा पाठलाग करायला सुरुवात केली आहे. Cervical Pain म्हणजे माने भोवती होणाऱ्या तीव्र वेदना. बऱ्याच वेळेस मान न हलवल्याने मानेच्या भागात कडकपणा येतो आणि मान जागची हलत नाही. ही समस्या साधी वाटत असली तरी त्याचे परिणाम फार गंभीर असू शकतात. या वेदना एकदा सुरू झाल्यातर त्या शक्यतो लवकर बऱ्या होत नाहीत. डॉक्टर यावर आरामाचाच सल्ला देत असतात. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन त्यावर उपचार केले पाहिजेत.

Neck Pain Home Remedies
SIP Investment: छोट्या गुंतवणुकीतून मोठा फायदा; १० वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळेल तगडं रिटर्न

Cervical Pain होण्याची मुख्य कारणे

१. अधिक काळ एकाच जागेवर बसून काम करणे.

२. माने वाकवून बसणे आणि काम करणे.

३. डोक्यावर जास्त वजन उचलणे.

४. झोपताना जाड उशी आणि चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे.

५. मार लागल्यामुळे किंवा एखादा अ‍ॅक्सीडंट झाल्यामुळे होणारा मानेचा त्रास.

६. झोपताना मानेची चुकीची पोझिशन असणे.

Cervical Pain होण्याची मुख्य लक्षणे

१. मानेच्या आजुबाजूच्या भागात जास्त वेदना होणे.

२. मानेचे दुखणे खांद्यापर्यंत पोहोचणे.

३. मान वळवताना त्रास होणे.

४. मानेच्या तीव्र वेदना आणि मानेला सुज येणे.

५. मानेपासून वेदना डोक्यापर्यंत पोहोचणे.

६. स्वभावात जास्त चिडचिड होणे.

Neck Pain Home Remedies
Summer Food: उन्हाळ्यात अंगाला सतत खाज येतेय? मग आहारात करा आताच बदल, टाळा 'हा' भयानक पदार्थ

Cervical Pain पासून लांब राहण्यासाठी उपाय

सगळ्यात आधी तुम्ही बसताना तुमची मान ३६० डिग्रीमध्ये चार ते पाच वेळा वळवा. दर दोन तासाने तुम्ही मान वळवलीत तर तुम्हाला मानेच्या वेदना होणार नाहीत. तसेच रात्री झोपताना शक्यतो मऊ आणि उंचीला बारिक उशीचाच वापर करा. तसेच सरळ पोझिशनमध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्या मानेवर ताण येणार नाही.

तसेच तुमच्या संपुर्ण शरीरासाठी हाडे मजबूत राहण्यासाठी तुम्ही डायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये अंजीराचे सेवन असावे. त्याने मानेच्या समस्या टाळायला मदत होते. तसेच तुम्ही सकाळी शक्यतो १५ मिनिटे तरी व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये मानेचा व्यायाम आवर्जुन करावा. त्याचसोबत तुम्ही बॉडी स्ट्रेचिंग, हातांना स्ट्रेच करणे, मानेला मागे पुढे वाकवणे अशा मुवमेंटचा समावेश करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Neck Pain Home Remedies
Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा एक्स्ट्रा बटर पावभाजी आणि कुरकुरीत पाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com