Saam Tv
घरात तयार केलेल्या पावभाजीला बऱ्याच वेळेस हॉटेल किंवा चौपाटी सारखी टेस्ट नसते.
आज आपण एक सोपी टिप फॉलो करून स्ट्रीट चौपाटी स्टाईल क्रिस्पी पाव आणि सॉफ्ट आणि एक्सट्रा बटरची पावभाजी तयार करणार आहोत.
सगळ्यात आधी तुमच्या आवडीच्या भाज्या धुवून उकळून घ्या.
फोडणीसाठी कांदा, बारिक टोमॅटो, आलं, मिरची, मीठ, मसाला, हळद, पाव भाजी मसाला आणि बटर घ्या.
आता तुम्ही मिक्सरमध्ये तुम्ही सर्व भाजी सॉफ्ट होईपर्यंत बारिक करून घ्या.
एक कढई घ्या. आता सगळ्यात महत्वाचं बटर घाला. मग कांदा आणि भाज्यांची सॉफ्ट ग्रेवी त्यात मिक्स करा.
सर्व मसाले फोडणीमध्ये घालून चांगली भाजी परतवून घ्या. मग त्यावर झाकन ठेवा.
दुसरी कडे एक पॅन ठेवा. त्यामध्ये बटर पसरवून घ्या. आता पावाला मध्य भागी कापून व्यवस्थित पसरवून शेकवा.
तुम्ही बटरचा वापर जास्त केलात तर पाव जास्त क्रिस्पी होतील. अशा पद्धतीने तुम्ही गरमा गरम पाव भाजी कांदा लिंबूसोबत सर्व्ह करा.