Summer Food: उन्हाळ्यात अंगाला सतत खाज येतेय? मग आहारात करा आताच बदल, टाळा 'हा' भयानक पदार्थ

Summer Skin Problems: शरीराचं तापमान वाढलं की तुम्हाला चक्कर येते. त्याचसोबत तुम्हाला अंगाला सुज आल्याचंही जाणवू शकतं. अशा अनेक समस्या तुम्हाला उन्हाळ्यात जाणवू शकतात. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात गोड आणि उष्ण पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
Summer Skin Problems
Summer Foodgoogle
Published On

बदलत्या ऋतूप्रमाणे आहारात बदल केले पाहिजे. हिवाळ्यात गरम तर उन्हाळ्यात थंड पदार्थ खाल्ले पाहिजेत. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीराला जास्त घाम येतो. पाण्याची पातळी कमी होते. तसेच उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणं खूप महत्वाचं असतं. तर सगळ्यात उन्हाळ्यात थंड खाण्याची इच्छा होते. मात्र त्या थंड पदार्थांसोबत किंवा पेयांसोबत आपण साखर किंवा गोड पदार्थ तुलनेने जरा जास्तच खात असतो. त्यामुळे तुम्हाला अंगाला खाज येणे अंग जळजळने किंवा घामोळे अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Summer Skin Problems
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी? जाणून घ्या पद्धत, वेळ, आणि पारंपारिक विधी

उन्हाळ्यात कोणते गोड पदार्थ खाऊ नये?

तुम्ही उन्हाळ्यात गुळाचे सेवन करू शकत नाही. आयुर्वेदात गुळाला प्रचंड महत्व असते. गुळामध्ये कॅल्शियम आणि आयरनचे प्रमाण अधिक असते. इतकच नाही तर गुळामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाणही सगळ्यात जास्त असतं. तर या सगळ्या गुणधर्मांची आवश्यकता आपल्या शरीराला जास्त असते. मात्र गुळ अवेळी आणि कितीही न खाता काही नियम पाहणं गरजेचं आहे. ते पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात गुळ न खाण्याचे कारण काय?

गुळ हा शरीरासाठी जास्त गरम असलेला किंवा उष्ण पदार्थ ठरू शकतो. गुळाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील हीट वाढू शकते. त्यात उन्हाळ्यात उन्हाचं तापमान प्रचंड वाढलेलं असतं. त्यात तुम्ही गुळ खाल्लात तर तुमच्या पोटात गरम पडू शकतं.

उलट्या होणे

तुम्ही जर उन्हाळ्यात गुळ सेवन करत असाल आणि उन्हात फिरतही असाल तर तुम्हाला प्रचंड उलट्या होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला डायरिया सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण गुळामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त असते. त्याने आपल्या शरीरात तयार होणाऱ्या ओमेगा-३ फॅटी अॅसिडची प्रक्रियासुद्धा मंदावते.

अंगाला सुज यणे

शरीराचं तापमान वाढलं की तुम्हाला चक्कर येते. त्याचसोबत तुम्हाला अंगाला सुज आल्याचंही जाणवू शकतं. याशिवाय नाकातून रक्त येणे. अशा समस्यांना गंभीर समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं.

अंगाला खाज येणे

उष्ण तापमानामुळे शरीराला जास्त प्रमाणात इजा होऊ शकतात. त्यामुळे गुळ हा उष्ण पदार्थ तुम्ही पुर्ण पणे टाळला पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Summer Skin Problems
Gold & Silver Prices: सोने-चांदीचा भाव वाढतच चाललाय, गेल्या ३ महिन्यांत किती रुपयांनी दर वाढले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com