Yashtika Acharya : वेटलिफ्टिंग करताना मानेवर अचानक २७० किलो वजन, मान मोडल्याने गोल्ड मेडालिस्ट यष्टिकाचा मृत्यू; पाहा Video

Female Powerlifter Yashtika Acharya Dies : यष्टिका नेहमीप्रमाणे सराव करत होती. त्याच्यासोबत त्याचे प्रशिक्षकही होते. मग अचानक सगळा भार त्याच्या मानेवर पडला. यानंतर त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंनी त्याच्यावरील वजन काढून टाकले.
gold medalist Powerlifter Yashtika Acharya dies
gold medalist Powerlifter Yashtika Acharya dies SaamTV
Published On

बिकानेर : हृदय हेलावून टाकणारी एक घटना बिकानेरमधून समोर आली आहे. महिला वेटलिफ्टर यष्टिका आचार्य हिचा वेटलिफ्टिंग करताना दुःखद मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी गोव्यात झालेल्या ३३व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये यष्टिकाने सुसज्ज प्रकारात सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. नुकतीच राष्ट्रीय विजेती ठरलेली यष्टिका आचार्य राज्य स्पर्धेची तयारी करत होती. यष्टिकाचे वडील ऐश्वर्या आचार्य (वय ५०) हे कंत्राटदार आहेत.

काल मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आचार्य चौक, बिकानेर येथे राहणारी यष्टिका ही नेहमीप्रमाणे सराव करत होती. त्याच्यासोबत तिचे प्रशिक्षकही होते. मग अचानक सगळं वजन तिच्या मानेवर पडलं. त्यानंतर तिच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तिच्या मानेवरील वजन काढले.

gold medalist Powerlifter Yashtika Acharya dies
Sanjay Raut : 'धस-मुंडे भेटीत मोठी डील', सुरेश धसांवर राऊतांचे आरोप; राऊतांच्या आरोपांनी धस संशयाच्या फेऱ्यात

यष्टिका आचार्य हिला आधी जिममध्येच सीपीआर आणि प्राथमिक उपचार देण्यात आले. तिच्या शरिराची कोणतीही हालचाल न झाल्याने तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. १७ वर्षीय यष्टिका आचार्य हिचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. यष्टिकालाही लग्न समारंभाला हजेरी लावायची होती, मात्र सरावामुळे ती गेली नाही.

प्रशिक्षकही जखमी...

यष्टिका आचार्यला तिचा प्रशिक्षक वजन उचलायला लावत असताना ही घटना घडली. या घटनेत प्रशिक्षकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कुटुंबीयांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

gold medalist Powerlifter Yashtika Acharya dies
Chhaava Box office Collection : विकी कौशलच्या 'छावा'च्या कमाईची घोडदौड कायम, २०० कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com