Liver: निरोगी लिव्हरसाठी तुमच्या रोजच्या जेवणात 'या' घटकांचा समावेश करा

Dhanshri Shintre

एक महत्त्वाचा अवयव

लिव्हर शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ बाहेर काढतो. त्याच्या निरोगीतेसाठी योग्य आहार आवश्यक आहे.

Liver | Freepik

पालेभाज्या

लिव्हरच्या आरोग्यासाठी पालक आणि मेथी सारखी हिरव्या पालेभाज्या खाणे अत्यंत फायदेशीर ठरतात.

Green Vegetables | Freepik

बीट आणि गाजर

बीट आणि गाजरमध्ये बेटेन असतो, जो लिव्हरच्या पेशींच्या दुरुस्तीला मदत करतो आणि आरोग्य सुधारतो.

Beets and carrots | Freepik

हळद

हळद लिव्हरमधील डिटॉक्सिफिकेशन एंझाइम्स वाढवते आणि त्यासोबतच जळजळ कमी करण्यात मदत करते.

Turmeric | Freepik

एवोकॅडो

एवोकॅडो ग्लूटाथिओनचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो लिव्हरला विषमुक्त करण्यास मदत करतो आणि त्याचे आरोग्य सुधारतो.

Avocado | Freepik

अक्रोड आणि जवस

अक्रोड आणि जवस बिया ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे उत्कृष्ट स्रोत असून, ते लिव्हरचे संरक्षण करतात.

Walnuts and linseeds | Freepik

ओट्स आणि ब्राऊन राईस

ओट्स आणि ब्राऊन राईससारखी फायबरयुक्त धान्ये लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

Oats and brown rice | Freepik

पाणी प्या

अल्कोहोलचे प्रमाण कमी करा आणि योग्य प्रमाणात पाणी प्या, यामुळे लिव्हर निरोगी राहते आणि कार्यक्षम बनते.

Water | Freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: तुमची किडनी आरोग्यदायी बनवण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स

येथे क्लिक करा