WhatsApp Chat Delete
WhatsApp Chat Delete Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Chat Delete : डिलीट केलेले WhatsApp चे चॅट पुन्हा वाचता येणार, जाणून घ्या कसे ?

कोमल दामुद्रे

WhatsApp Tips And Tricks : जगभरातील अनेक वापरकर्ते WhatsApp चा वापरतात. WhatsApp वरुन फाईल्सची देवाण-घेवाण, फोटो व चॅट करणे सोपे झाले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कसे पाहू शकता?

अनेकवेळा असे घडते की कोणीतरी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) मेसेज पाठवते आणि तुम्हाला तो वाचताही येत नाही की तो डिलीट झालेला असतो. 2017 मध्ये, कंपनीने Delete For everyone हे फीचर सादर केले, ज्या अंतर्गत मेसेज पाठवणारा 2 दिवसात त्याचा मेसेज डिलीट करू शकतो. हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त आहे, परंतु कधीकधी हे अडचणीचे कारण बनते.

व्हॉट्सअॅपवर मेसेज लिहिल्यानंतर तो का डिलीट झाला, त्यात काय होते हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, परंतु आम्हाला तो वाचता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips) व ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचता येईल.

व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे ?

1. यासाठी तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावे लागेल. गेट डिलीटेड मेसेजेस असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड (Downlode ) करता येते. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

2. अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अॅपला सर्व आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील. त्यानंतर तुम्ही डिलीट केलेले मेसेज सहज वाचू शकाल. ही पद्धत येणार्‍या संदेशांवर काम करेल.

3. जेव्हा जेव्हा व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट केला जातो तेव्हा डिलीट केलेला मेसेज पाहण्यासाठी फक्त अॅप उघडावे लागते.

4. परंतु, अॅप काही आवश्यक परवानगी मागतो. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर Apps आणि Notifications वर जा. यानंतर, अॅप सूचना आणि स्टोरेजमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देखील विचारेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope 18 May : मेष ते मीन राशीसाठी शनिवार काय घेऊन आलाय?

TVS Apache चा नवीन Black Dark Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bachchu Kadu: निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये: बच्चू कडू

Arjun Tendulkar- Nicholas Pooran: पूरनचे लागोपाठ २ षटकार अन् अर्जुन तेंडुकरने मैदानच सोडलं! नेमकं काय घडलं?

MI vs LSG Highlights: हंगामाची सुरुवात अन् शेवटही पराभवानेच! घरच्या मैदानावर मुंबईचा लखनऊकडून दारुण पराभव

SCROLL FOR NEXT