WhatsApp Update : WhatsApp मध्ये लवकरच येणार नवीन अपडेट; मेसेज, व्हिडिओ आणि इमेजेस करता येणार एडिट, पाहा कसे

WhatsApp New Version : लवकरच WhatsApp वापरकर्ते अ‍ॅपमधील मेसेज, व्हिडिओ किंवा फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी ते एडिट देखी करु शकतात.
WhatsApp Update
WhatsApp UpdateSaam Tv
Published On

WhatsApp New Features : मेटा WhatsApp वापरकर्त्याचा अनुभव चांगला करण्यासाठी सतत काम करत असते. या वर्षी व्हॉट्सअॅपमध्ये आतापर्यंत अनेक उत्तम फीचर्स आले आहेत. दरम्यान, अॅपबाबत नवीन अपडेट आले आहे.

लवकरच WhatsApp वापरकर्ते अ‍ॅपमधील मेसेज, व्हिडिओ (Video) किंवा फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी ते एडिट देखी करु शकतात. या वैशिष्ट्यामुळे लोकांचा बराच वेळ वाचणार आहे कारण आतापर्यंत लोकांना हे काम कॉपी-पेस्ट करून करावे लागत होते.

WhatsApp Update
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

व्हॉट्सअॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट (Website) wabetainfo नुसार, व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्यानंतर यूजर्स मेसेज, व्हिडिओ आणि इमेजचे वर्णन एडिट करू शकतील.

सध्या तुम्हाला एखादा मेसेज फॉरवर्ड करायचा असेल आणि त्यातून काही मजकूर काढून टाकायचा असेल किंवा जोडायचा असेल तर तुम्हाला मेसेज कॉपी पेस्ट करून हे काम करावे लागेल. मेसेजसाठी हे कार्य सोपे आहे परंतु फोटो आणि व्हिडिओंसह ते खूप कठीण आहे कारण तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा गॅलरीमधून शोधून पाठवावा लागेल.

WhatsApp Update
How To Withdraw PF Amount : घरबसल्या PF Account मधून पैसे कसे काढाल ? या प्रोसेस फॉलो करा

परंतु नवीन अपडेटनंतर, वापरकर्ते फोटो, व्हिडिओ आणि मेसेज थेट अॅपवरूनच फॉरवर्ड करण्यापूर्वी ते संपादित करण्यास सक्षम असतील.

सध्या, हे अपडेट काही बीटा परीक्षकांसाठी जारी केले गेले आहे, जे लवकरच सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाईल. या फीचरच्या मदतीने लोक फोटो, व्हिडिओ, इमेज, GIF आणि डॉक्युमेंट्स फॉरवर्ड करण्यापूर्वी कॅप्शन एडिट करू शकतील.

WhatsApp Update
Home Loan Prepayment : गृहकर्जातून वेळेआधीच व्हा मुक्त; पाच टीप्स तुमचं टेन्शन कमी करतील

1. लवकरच तुम्ही वैयक्तिक चॅट लॉक करण्यात सक्षम व्हाल

व्हॉट्सअॅप आणखी एका आश्चर्यकारक फीचरवर काम करत आहे ज्यानंतर वापरकर्ते वैयक्तिक चॅट लॉक करू शकतील. म्हणजेच, जर तुम्हाला प्रत्येकापासून तुमचे चॅट लपवायच्या असतील, तर तुम्ही त्यावर लॉक लावून हे काम करू शकाल. वापरकर्ते यासाठी पॅटर्न, पासकोड इत्यादी वापरू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com