स्वयंपाकघरात विविध मसाल्यांमध्ये अदरक देखील वापरतात. केवळ चहामध्येच नाही तर अनेक पदार्थांमध्ये अदरकची पेस्ट वापरतात. चहा, भाज्या आणि अनेक चमचमीत पदार्थांमध्ये अदरक वापरतात. आले केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. गरमा गरम अदरक चहा, काढा प्यायल्यास डोकेदुखी, मळमळ यासारख्या समस्या दूर होतात.
अनेक पदार्थ्यांमध्ये अदरक वापरत असले तरी ते सोलण्याचे काम अत्यंत कठीण असते. खडबडीत आकार, पातळ साल असलेले अदरक सोलणे खुपच त्रासदायक वाटते. अशावेळी घाईगडबडीच जेवण बनवताना अनेक स्त्रिया अदरक सोलण्यासाठी सुरीचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितीयेक सुरीने अदरक सोलल्यास जाड साल निघू शकते यामुळे अदरक मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे जर तुम्हालाही अदरक सोलायचे असेल तर तुम्ही सोपी पद्धत वापरून पाहा.
चमच्याने अदरक सोलण्याची सोपी पद्धत
अदरक सोलण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे चमचा वापरणे. अदरक सोलण्यासाठी चमच्याच्या कडेने हळुवारपणे वरचा भाग खरवडून काढा.
अदरकचे लहान लहान तुकडे करा
अदरकचा भाग खुप मोठा असेल तर तुम्ही त्याचे लहान लहान तुकडे करा. त्यानंतर प्रत्येक तुकडा चमच्याने सोलू शकता.
भाजी सोलण्याचे साधन
अदरक सोलण्यासाठी तुम्ही भाजी सोलण्याचे यंत्र वापरू शकता. अदरकची साल पातळ असल्याने तुम्ही ते सोलण्यासाठी सहज वापरू शकता.
अदरकची साल काढावी का?
प्रत्येकवेळी अदरकची साल काढणे महत्वाचे आहे असं नाही. अनेक पदार्थ्यामध्ये अदरकची साल न काढता त्याचा वापर करता येतो. जर तुम्ही चहा, आमटी, भाजीसाठी अदरक वापरणार असाल तर ते पूर्णपणे धुतल्यानंतर सालीसकट वापरू शकता. अदरक वापरण्यापूर्वी स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.