फ्लॉवर बटाटा भाजी कशी बनवायची ? सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

रोजच्या जेवणाचा प्रश्न

रोज रोज जेवणात काय बनवावे? असा प्रश्न प्रत्येक महिलांना पडतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपी आणि झटपट बनणारी भाजी सांगणार आहे ती म्हणजे फ्लॉवर बटाटा भाजी.

FOOD | pexels

भाजी बनवण्याची रेसिपी

फ्लॉवर बटाटा भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Flower Batata Bhaji

साहित्य

प्लॉवर बटाटा भाजी बनवण्यासाठी फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो, तेल, मोहरी, मसाला, हळद, मीठ, गरम मसाला हे साहित्य एकत्र करा.

Flower Batata Bhaji

भाजी बारीक चिरून घ्या

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी फ्लॉवर स्वच्छ धुवून बारीक कापा. फ्लॉवरच्या भाजीचे बारीक तुकडे करा. त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो बारीक कापा.

Flower Vegetable Chopped

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात टोमॅटो चांगला परतून घ्या. नंतर या फोडणीमध्ये हळद, मसाला आणि मीठ मिक्स करा.

Fodni

फ्लॉवर आणि बटाटे मिक्स करा

मिश्रणात बारीक चिरलेली फ्लॉवर आणि बटाटे मिक्स करून भाजी एकजीव करा. नंतर भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवा.

Flower Batata Bhaji

गरमा गरम भाजी

भाजी वाफेवर शिजली की त्यात थोडे गरम पाणी आणि गरम मसाला मिक्स करून संपूर्ण भाजी एकजीव करा. अशाप्रकारे गरमा गरम फ्लॉवर भाजी तयार होईल.

Flower Batata Bhaji

NEXT: Tiles Cleaning Tips: फक्त १० रुपयांत टाईल्स स्वच्छ कशा करायच्या? सोपी आहे ट्रिक

Tiles Cleaning Tips
येथे क्लिक करा...