Manasvi Choudhary
आपण नियमितपणे झोपण्यासाठी उशीचा वापर करतो. परंतु, नियमित उशी वापरल्यामुळे घाम, डोक्यातील केसांचे तेल आणि डँड्रफ उशीमध्ये साचून राहते.
उशी खराब झाली की त्यातून कुबट दुर्गंधी येऊ लागते यासाठी नियमित वापरणारी उशी महिन्यातून तीन ते चार वेळा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
उशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ५ सोपे घरगुती उपाय लक्षात घेणे महत्वाचे आहे
उशीवरील डाग आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. उशीच्या ज्या भागावर डाग आहे, तिथे बेकिंग सोडा लावा आणि १ तास तसाच राहू द्या. त्यानंतर उशी स्वच्छ धुवा.
जर तुमच्या घराच्या खिडकीत किंवा गच्चीवर कडक ऊन येत असेल, तर उशी कडक उन्हात ठेवा. उन्हामुळे उशीतील ओलावा निघून जाईल आणि दुर्गंधी कमी होईल.
जर उशीला जास्तच खराब वास येत असेल, तर एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा आणि उशीवर मारा नंतर उशी कोरड्या हवेवर सुकवा. दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
उशीला छान सुवास राहण्यासाठी लिंबाचा रस आणि निलगिरीच्या तेल पाण्यात मिसळून उशीवर स्प्रे करा. यामुळे उशीला छान सुगंध येईल.
उशी खराब होऊ नये म्हणून दर आठवड्याला उशीचे कव्हर बदला. खराब झालेले कव्हर गरम पाण्याने धुवा.