Gas Lighter Cleaning Tips: गॅस लायटर स्वच्छ कसा करायचा? सोपी पद्धत आजच जाणून घ्या

Kitchen Lighter Cleaning Tips: किचन लायटर स्वच्छ कसा करायचा? चिकट व तेलकट गॅस लायटर नव्यासारखा चमकवण्याचे सोपे उपाय जाणून घ्या
Gas Lighter Cleaning Tips
Gas Lighter Cleaning TipsSaam Tv
Published On: 

स्वयंपाकघरात गॅस पेटवण्यासाठी लायटरचा वापर करतो. परंतु रोज वापणारा लायटर काही दिवसांनी खराब होतो. लाटरवर जेवण बनवताना उडणारे तेल, मसाले आणि ओले हात लावल्याने चिकट आणि खराब होतो. अनेकदा चिकट, ओल्या झालेल्या लायटरला हात लावणेही नकोसे वाटते. अशावेळी अनेक महिलांना प्रश्न पडतो की, लायटर नेमका स्वच्छ करायचा कसा? कारण लायटरच्या आतमध्ये स्पार्क निर्माण करणारे स्प्रिंग मेकॅनिझम आणि गॅस असते, ज्यामुळे लायटर पाण्याने धुतल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

लायटर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर न करता घरच्या घरी सोप्या पद्धतीने धुवू शकता. यासाठी नेमकं काय करायचे ते सविस्तरपणे पाहूया.

Gas Lighter Cleaning Tips
Combined Toilet and Bathroom Vastu Tips for Home: घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असावे की नाही? वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?

साबण किंवा डिटर्जंटचा वापर (Soap or Mild Detergent)

मऊ सुती कापड ओला करून त्यावर थोडासा साबण किंवा लिक्विड डिटर्जंट लावा आणि लायटरचा बाहेरील भाग नीट पुसून घ्या. यामुळे लायटरवरील तेलकटपणा आणि चिकटपणा लगेच निघून जातो.

रबिंग अल्कोहोलचा वापर (Rubbing Alcohol / Sanitizer)

लायटर स्वच्छ करण्यासाठी रबिंग अल्कोहोल सुरक्षित पर्याय आहे. अल्कोहोल हवेच्या संपर्कात येताच लगेच सुकते, त्यामुळे लायटरच्या आत ओलावा जात नाही. कापसावर किंवा कापडावर थोडे रबिंग अल्कोहोल घेऊन लायटर स्वच्छ करा.

Gas Lighter Cleaning Tips
मऊ आणि गोल चपात्या कशा बनवायच्या? जाणून घ्या सोप्या टिप्स

बेकिंग सोड्याचा उपाय (Baking Soda Paste):

लायटरवर हळदीचे, तेलाचे किंवा मसाल्यांचे हट्टी डाग असतील, तर त्यावर बेकिंग सोडा टाका आणि हलक्या हाताने घासा. त्यानंतर एका स्वच्छ, कोरड्या कापडाने लायटर पुसून घ्या. लायटर अगदी नव्यासारखा चमकेल.

लायटर स्वच्छ करताना घ्यावयाची आवश्यक काळजी

  • लायटर स्वच्छ करण्यापूर्वी त्याची ज्योत पुर्णपणे विझलेली आहे की नाही हे तपासा. तसेच लायटर थंड झाले आहे याची खात्री करा.

  • लायटर स्वच्छ करण्यासाठी वापरणारे कापड जास्त ओले करू नका. घट्ट पिळून घ्या, जेणेकरून पाण्याचे थेंब लायटरच्या आत जाणार नाहीत.

  • लायटर स्वच्छ केल्यानंतर लगेच गॅस पेटवण्यासाठी वापरू नका. काही मिनिटे कोरड्या हवेत पूर्णपणे सुकू द्या.