Manasvi Choudhary
चपाती मऊ आणि हलकी-फुलकी होण्यासाठी पीठ चांगले मळून घ्या. चवीनुसार त्यात थोडेसे मीठ घाला. पीठ मळल्यानंतर १०-१५ मिनिटे झाकून ठेवल्यास चपात्या मऊ होतील.
पीठ मळताना पाण्याचे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे. पिठामध्ये एकदम पाणी न ओतता थोडे-थोडे पाणी घेऊन मळावे. पीठ जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
चपाती गोल लाटण्यासाठी पोलपाटावर कणकेचा छोटा गोळा घ्या. त्याला थोडे सुके पीठ लावून ठेवा त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने हळुवारपणे गोल आकार द्या.
चपाती भाजण्यासाठी सर्वात आधी गॅसवर तवा ठेवा. तवा साधारण मध्यम गरम झाला की त्यावर लाटलेली चपाती टाका.
तव्यावर टाकलेली चपाती एका बाजूने हलकीशी भाजल्यानंतर ती पलटून दुसरी बाजू भाजा.