बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ कश्या करायच्या? महागड्या क्लिनरऐवजी सोपी घरगुती पद्धत समजून घ्या

How To Clean Bathroom Tiles: बाथरुमच्या टाईल्सवरील हट्टी डाग आणि घाण काढण्यासाठी सोपी पद्धत जाणून घ्या.
How To Clean Bathroom Tiles
How To Clean Bathroom TilesSaam Tv
Published On: 

घराच्या स्वच्छतेसाठी बाथरूमची स्वच्छता देखील महत्वाची आहे. बाथरूममध्ये नवीन टाईल्स लावल्या की त्या छान चमकतात, सुंदर दिसतात परंतु कालांतराने आपण नवीन टाईल्स लावतो तेव्हा त्या छान चमकतात, पण कालांतराने त्याची चमक कमी होते. साबणाचे डाग, ओलसरपणा आणि घाण हळूहळू टाईल्सवर जमा होते त्यामुळे त्याची चमक कमी करते. यासाठी उपाय म्हणून महागडे क्लिनर विकत घेऊन स्वच्छ करतात पण तरीही हे डाग काही जात नाही.

पण तुम्हाला माहितीये का? यासाठी तु्म्ही क्लिनर घेण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. घाण झालेल्या बाथरूमच्या टाईल्स चमकवण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे? ही सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती जाणून घ्या.

How To Clean Bathroom Tiles
Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

फरशी स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र वॉशिंग पावडर, इनो, हार्पिक टॉयेलट क्लिनर, कपडे धुण्याचा ब्रश, स्क्रबर हे साहित्य तयार ठेवा. क्लिनिंग लिक्विड कसे तयार करायचे? सर्वातआधी, एका भांड्यात ३ चमचे वॉशिंग पावडर टाका. त्यानंतर, त्यात इनोचे एक पाकीट टाका. मग, थोडे हार्पिक टॉयलेट क्लीनर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. या मिश्रणाला फेस येऊ लागेल, ज्यामुळे घाण कमी होण्यास मदत होईल.

How To Clean Bathroom Tiles
Public Toilet Tips For Women: महिलांनी पब्लिक टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी १० महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

टाईल्स स्वच्छ कश्या करायच्या?

टाईल्सवर जिथे सर्वात जास्त घाण साचली आहे, तिथे क्लिनिंग लिक्विड ओतून ठेवा. नंतर, कपड्यांच्या ब्रशने सर्व ते पसरवा. लिक्विड टाकल्यानंतर, ते अर्धा ते पाऊन तास तसेच ठेवा यामुळे टाईल्सवरचे हट्टी डाग कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर, ब्रशने टाईल्स स्वच्छ घासा. टाईल्सवरचे हट्टी डाग निघत नसतील तर स्टीलचा स्क्रबर वापरा. ​​हळूहळू, घाण कमी होईल आणि फरशी पुन्हा नव्यासारखी चमकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.