प्रवासादरम्यान, कार्यालयात, रेल्वे स्टेशनवर किंवा मॉलमध्ये आपण सार्वजनिक टॉयलेटचा वापर करतो. परंतु, सार्वजनिक ठिकाणच्या वॉशरुममध्ये सततच्या वापरामुळे स्वच्छता कमी असते आणि तिथे बॅक्टेरिया किंवा जंतूंचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे महिलांना युरीन इन्फेक्शन (UTI) किंवा त्वचेच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटला जाण्यापूर्वी आणि वापरताना महिलांनी १० महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवाव्यात
१. सीटवर बसण्याऐवजी स्कॉट (Squat) स्थितीत बसा: पब्लिक टॉयलेटमध्ये थेट सीटवर बसणे टाळावे. सीटवर अनेक जंतू असू शकतात, त्यामुळे नेहमी शरीराला न टेकवता हवेत थोडे वर म्हणजेच स्कॉट स्थितीमध्ये बसणे आरोग्यासाठी सुरक्षित ठरते.
२. अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळा: टॉयलेटमधील भिंती, दरवाजाच्या कड्या किंवा इतर वस्तूंना उघड्या हाताने स्पर्श करणे टाळा. वस्तूंना स्पर्श करण्यासाठी टिश्यू पेपरचा (Tissue Paper) वापर करा.
३. फ्लश करताना झाकण बंद करा: बॅक्टेरिया हवेत पसरू नये म्हणून फ्लश करताना टॉयलेटचे झाकण बंद करून फ्लश करा. जर झाकण नसेल, तर फ्लश केल्यानंतर थोडे बाजूला उभे राहून सुरक्षित अंतर ठेवा.
४. कोऱ्या आणि कोरड्या टॉयलेट पेपरचा वापर करा: टॉयलेटमध्ये आधीपासून ठेवलेला किंवा ओला, खराब झालेला टॉयलेट पेपर वापरू नका. शक्यतो स्वतःसोबत असलेली फ्रेश टिश्यू रोल किंवा नॅपकिन वापरा.
५. फरशी ओली असल्यास काळजी घ्या: टॉयलेटची फरशी खूप ओली किंवा खराब असेल, तर तिथे उभे राहताना किंवा चालताना काळजी घ्या. तसेच तुमचे सामान (बॅग इ.) कधीही फरशीवर ठेवू नका.
६. कपडे व्यवस्थित सांभाळा: ड्रेस, साडी किंवा कपडे जमिनीवर किंवा अस्वच्छ भागाला स्पर्श होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्या.
७. हँड सॅनिटायझरचा वापर करा: वॉशरुममध्ये हात धुण्यापूर्वी किंवा बाहेर पडताना जंतूंचा नाश करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या हँड सॅनिटायझरचा वापर करा.
८. हात स्वच्छ धुणे अत्यंत महत्त्वाचे: टॉयलेट युज करून बाहेर आल्यानंतर साबणाने किमान २० सेकंद हात उत्तम प्रकारे स्वच्छ धुवा. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसेल तर सॅनिटायझरचा वापर करा.
९. संसर्गापासून दूर राहण्यासाठी स्प्रे वापरा: सध्या बाजारात 'टॉयलेट सीट सॅनिटायझर स्प्रे' मिळतात. सीट वापरण्यापूर्वी त्यावर हा स्प्रे मारल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात.
१०. स्वतःचा रूमाल किंवा नॅपकिन ठेवा: हात पुसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कपड्याचा वापर करू नका, नेहमी स्वतःचा स्वच्छ रूमाल किंवा टिश्यू पेपर जवळ ठेवा. टिप येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.