Manasvi Choudhary
आल्याचा चहा अनेकांना आवडतो. मसालेदार आल्याचा चहा प्यायल्याने मूड फ्रेश होण्यास मदत होते.
सर्दी, खोकला या सारख्या संसर्गजन्य आजारांवर देखील आल्याचा चहा उत्तम आहे. आल्याचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
परंतु चहा बनवताना आलं कधी टाकावे. असा प्रश्न अनेकांना पडतो. आल्यामुळे चहाला चव येत असली तरी अतिप्रमाणात आणि योग्य वेळी चहामध्ये आलं टाकणे महत्वाचे आहे.
अनेकजण आलं ठेचून चहामध्ये टाकतात मात्र आलं किसून चहामध्ये घातल्याने चहामध्ये आल्याचा स्वाद मिसळतो आणि चहाची चव वाढवतो. ं
अनेकजण चहापावडर आलं टाकतात मात्र त्यामुळे चव बदलते. पाण्यात आलं उकळून घेतल्यानंतर त्यात चहापावडर टाका ज्यामुळे आल्याची चव आणि पोषक तत्वे मिळतात.
आलं उष्ण गुणधर्म असल्याने अतिप्रमाणात आलं चहामध्ये टाकल्याने आरोग्याला त्रास होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.