Manasvi Choudhary
सणासुदीला महिला खास पारंपारिक लूक करतात. विवाहित महिला सणासुदीला पारंपारिक मंगळसूत्र घालतात.
तुम्हालाही दिवाळीमध्ये कुर्ती, साडी आणि ड्रेसवर मंगळसूत्र परिधान करायचे असतील तर तुम्ही लेटेस्ट डिझाईन्सचे पारंपारिक मंगळसूत्र परिधान करा.
दोन वाट्यांच्या मण्यांचे मंगळसूत्र अत्यंत शुभ मानले जाते. आता या वाट्यांवर बारीक कोरीव काम किंवा खड्यांचे डिझाईन केले जाते.
पेंडंटवर माता लक्ष्मी, मयूर किंवा कमळाची सुबक नक्षी असलेले टेम्पल वर्क दागिने सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. ते तुम्ही सणासुदीसाठी निवडू शकता.
ज्यांना रोजच्या वापरात किंवा ऑफिसमध्ये लांब मंगळसूत्र घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी शॉर्ट लेन्थ काळ्या सोनेरी मण्यांचे मंगळसूत्र परिधान करा.
काळ्या मण्यांच्या पोतीत मध्येच छोटे मोती जोडल्यास मंगळसूत्राला एक वेगळाच पारंपरिक टच मिळतो. हे डिझाईन पेस्टेल साड्या आणि इंडो-वेस्टर्न गाऊन्सवर खूप छान उठून दिसते.
नाजूक सोन्याच्या फुलांचे किंवा पानांचे डिझाईन असलेले पेंडंट आणि त्याला जोडलेली बारीक काळी चेन. हे डिझाईन वजनाला हलके असते आणि कोणत्याही कपड्यांवर सुंदर दिसते.