Manasvi Choudhary
दिवाळी सण म्हटला की, महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करतात. साडी नेसतात.
तुम्हालाही दिवाळीनिमित्त नवीन साडी खरेदी करायची असेल तर सिक्वेन साडी निवडा. सिक्वेन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.
दोन रंगांचा अप्रतिम मेळ असणाऱ्या ओमब्रे साड्या तुम्ही निवडू शकता.
सिक्वेन साड्या तुम्ही सोनेरी, चंदेरी डिझाईन्स असलेल्या साड्या निवडू शकता या साड्या कोणावरही उठून दिसतात.
ज्यांना जास्त हेवी साडी नेसायची नसते, त्यांच्यासाठी हलक्या वजनाच्या जॉर्जेट किंवा शिफॉन कापडावरील सिक्वेन साड्या निवडा. या साड्या चापून चोपून बसतात आणि सुंदर दिसतात.
नेटची सिक्वेन साडी अत्यंत सुंदर दिसते. नेटच्या साडीवर सिक्वेन वर्क असेल तर ती साडी तुम्ही निवडावी.
सणासुदीला थोडा पारंपरिक टच हवा असल्यास, संपूर्ण सिक्वेनच्या साडीला मखमली काठ असलेली साडी निवडा.