Manasvi Choudhary
अंगावर अचानक शहारे का येतात यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?
अनेकदा आपल्याला अचानक खूप थंडी वाजू लागली, एखादी भीतीदायक गोष्ट आठवली, अंगावर काटा येतो ज्याला आपण शहारे आले असं देखील म्हणतो.
अंगावर शहारे आले की, त्वचेवरील केस उभे राहतात ही एक अतिशय सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, पण यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊया.
त्वचेच्या प्रत्येक केसाच्या मुळाशी एक अत्यंत सूक्ष्म स्नायू असतो, ज्याला 'अॅरेक्टर पिली' म्हणतात. जेव्हा हे स्नायू आकुंचन पावतात, तेव्हा केसांच्या मुळाशी असलेला भाग वर उचलला जातो आणि त्वचेवर लहान लहान उंचवटे तयार होतात, ज्याला आपण शहारे किंवा अंगावर काटा येणे असे म्हणतो.
जेव्हा वातावरणात अचानक थंडी वाढते, तेव्हा शरीर स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी धडपड करते. केस उभे राहिल्यामुळे शरीराभोवती हवेचा एक उबदार थर तयार होतो, जो शरीराची उष्णता बाहेर जाण्यापासून रोखतो.
जेव्हा आपण एखादे मनाला भिडणारे गाणे ऐकतो, अचानक आश्चर्यचकित होतो, किंवा खूप आनंद होतो, तेव्हा शरीरावर शहारे येतात.
जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा आपण संकटात असतो, तेव्हा स्नायू आकुंचन पावतात आणि काटा उभा राहतो