वॉशिंग मशीनमध्ये कपडे उलटे धुवावेत की सरळ? कपडे धुण्याची योग्य पद्धत कोणती?

वॉशिंग मशीनमध्ये कपडे उलटे की सरळ कोणत्या पद्धतीने धुवावे? कपडे उलट्या बाजूने धुतल्याने रंग, प्रिंट आणि फॅब्रिक कसे सुरक्षित राहतात, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
How to Wash Clothes in Washing Machine Inside Out or Outside
How to Wash Clothes in Washing Machine Inside Out or Outside
Published On: 

कपडे धुणे हे रोजचे काम आहे. मात्र कपडे धुताना ते व्यवस्थित धुणे महत्वाचे आहे. याशिवाय कपडे धुताना तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे. अनेक महिला वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना कपडे उलटे करून धुतात. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की वॉशिंग मशीनमध्ये कपडे उलटे की सिधे कोणत्या पद्धतीने धुवावे.

How to Wash Clothes in Washing Machine Inside Out or Outside
Eye Twitching Problem : डोळे अचानक का फडफडतात? यामागचं नेमकं कारण काय?

जर तुम्ही कपडे उलटे करून धुतले तर कपड्यांच्या बाहेरच्या कापडाची झीज होत नाही. तसेच कपड्याचा रंग अधिक काळ टिकून राहतो. टिकून राहू शकतो. शिवाय, या पद्धतीमुळे कपड्यांच्या आतून घामाचे, शरीरातील तेलाचे आणि डिओडोरंटचे अंश काढून टाकण्यासही मदत होते. तथापि, सर्व प्रकारचे कपडे उलट्या बाजूने धुणे योग्य नाही.

How to Wash Clothes in Washing Machine Inside Out or Outside
Vastu Tips for Dining : घरात 'या' 5 ठिकाणी बसून जेवण करणे टाळा; अन्यथा घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा!

कपडे उलटे करून धुतल्याने काय फायदे होतात?

  • कपडे उलट्या बाजूने धुतल्याने धुताना त्यांच्या बाहेरील कापडाची झीज होत नाही. यामुळे गडद आणि चमकदार रंगांचे कपडे जास्त काळ नवीन दिसण्यास मदत होते.

  • टी-शर्टवरील प्रिंट्स, डिझाइन्स आणि नक्षी काम लवकर खराब होऊ शकतात. टी-शर्ट उलट्या बाजूने धुतल्याने बाहेरील डिझाइन घासली जात नाही आणि यामुळे कपडे अधिक काळ टिकून राहतात.

  • जीन्सवरील बटणे, झिप आणि जाड कापड धुताना इतर नाजूक कापडांना नुकसान पोहोचवू शकतात. जीन्स उलट्या करून धुतल्याने असे घर्षण टाळण्यास मदत होते.

  • व्यायामाचे कपडे उलट्या बाजूने धुणे उत्तम असते. घाम, शरीरातील तेल, डिओडोरंट आणि दुर्गंधी कपड्यांच्या आतल्या बाजूला जमा होतात. ते उलट्या बाजूने धुतल्याने अधिक चांगली स्वच्छता होतो.