बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘अक्वान’ चक्रीवादळ आता अधिक तीव्र होत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील चार राज्यांसह महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण आणि महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ नेल्लोर आणि यानमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित राहणार नाही. महाराष्ट्रातील विदर्भ भागातही याचा परिणाम जाणवू शकतो. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.