भाजलेल्या वांग्याचं भरीत कसं बनवायचं? सोपी रेसिपी माहितीये का?

Manasvi Choudhary

वांग्याची भाजी

वांग्याची तीच तीच मसालेदार भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज नवीन रेसिपी ट्राय करा.

Vangyache Bharit Recipe | saam

वांग्याचे भरीत रेसिपी

वांग्याचं झणझणीत भजीत खायला अनेकांना आवडते. प्रत्येकाची भरीत बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आज आपण भाजलेल्या वांग्याचं भरीत कसं बनवायचं? ही रेसिपी पाहूया.

Vangyache Bharit Recipe

साहित्य

वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांगी, कांदा, हिरवी मिरची, लसूण ठेचा, मीठ, शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, धना पावडर , जिरे, मोहरी, हळद, कोथिंबीर, तेल हे साहित्य एकत्र करा.

Brinjal

वांगी स्वच्छ धुवा

वांग्याचं भरीत बनवण्यासाठी सर्वातआधी वांगी स्वच्छ धुवा. त्यानंतर सुरीने त्यावर बारीक चिरा पाडून घ्या. चिरलेल्या वांग्यांना थोडे तेल लावा आणि गॅसवर भाजून घ्या.

Vangyache Bharit Recipe |

मॅश करा

वांगं भाजून घेतल्यानंतर त्याची साल काढून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये वांग्याला मॅश करा.

Vangyache Bharit Recipe

फोडणी द्या

गॅसवर फोडणीसाठी कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा चांगले परतून घ्या.

Fodni

मसाले मिक्स करा

कांदा साधारण सोनेरी झाला की त्यात लसणाचा ठेचा, गरम मसाला, हळद पावडर आणि धना पावडर मिक्स करा.

spices. | pinterest

वांग्याचं भरीत तयार होईल

मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यात मॅश केलेलं वांगं परतून घ्या. नंतर शेंगदाण्याचा कूट मिक्स , चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा. साधारण ५ ते ७ मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम वांग्याचं भरीत तयार होईल.

Vangyache Bharit Recipe

NEXT: Pillow Cleaning Tips: उशी स्वच्छ कशी करायची? ५ टिप्स महत्त्वाच्या

Pillow Cleaning Tips
येथे क्लिक करा...