Poha Bhel Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Poha Bhel Recipe : पोह्यांची भेळ तुम्ही कधीच खाल्ली नसेल; रेसिपी वाचा आणि घरीच बनवा

Poha Bhel Recipe at Home : मात्र तुम्ही कधी पोह्यांची भेळ खाल्ली आहे का? आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून भेळ कशी बनवायची याचीच माहिती सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

रोज सकाळी काय नाश्ता बनवावा याचं प्रत्येक व्यक्तीला टेंशन असतं. सकाळी कामाला जाण्याची गडबड असते. त्यामुळे झटपट काही बनवता येते का, असा सर्व महिलांचा प्रयत्न असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अगदी पाच मिनिटांत तयार होणारी एक डिश सांगणार आहोत.

पोहे आजवर तुम्ही अनेकदा नाश्त्याला खाल्ले असतील. पोहे खाऊन खाऊन कंटाळा आल्याने तुम्ही कधी चहा पोहे तर कधी गोड पोहे आणि पोहे पराठा सुद्धा बनवून खाल्ला असेल. मात्र तुम्ही कधी पोह्यांची भेळ खाल्ली आहे का? आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून भेळ कशी बनवायची याचीच माहिती सांगणार आहोत.

साहित्य

पोह्यांपासुन भेळ बनवण्यासाठी

पोहे

शेंगदाणे

तेल

तिखट डाळ

भाजलेले चणे

मिरची

जिरे

कांदा

मोहरी

कडीपत्ता

हळद

मीठ

ही सामग्री लागणार आहे.

कृती

पोहे बनवताना सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून घ्या. त्यांनतर हे पोहे एका मोठ्या ताटात पसरवून फॅनखाली वाळत ठेवा. पोहे वाळत आहेत तोवर पुढील तयारी करण्यास सुरुवात करा. त्यासाठी एक कढई घ्या. यामध्ये थोडं तेल तळण्यासाठी ठेवा. तेल तापल्यावर त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्या. त्यानंतर शेंगदाणे लगेचच काढून घा. शेंगदाणे जास्तवेळ कढईत ठेवल्यास ते करपू शकतात.

पुढे या तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्या. त्यानंतर यात बारीक चिरलेली मिरची सुद्धा थोडी तळून घ्या. नंतर मीठ मिक्स केल्यावर हळद टाकून गॅस बंद करा. आता तेल गरम असतानाच यामध्ये शेंगदाणे, तीखड डाळ आणि भाजलेले चणे मिक्स करा. नंतर यात सुकवलेले पोहे सुद्धा मिक्स करून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यांमध्ये शेव आणि कांदा मिक्स करून भेळ बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने तयार झाली तुमची चटपटीत पोहा भेळ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT