Easy No-Onion No-Potato Indian Recipes google
लाईफस्टाईल

No Onion Recipes: ना बटाटा–ना कांदा! तरीही चव अफलातून; करून पाहा या सोप्या आणि चटपटीत भाज्यांची रेसिपी

Quick Sabzi Recipes: कांदा-बटाटा न वापरता बनवता येणाऱ्या या झटपट, सोप्या आणि चविष्ट भाज्या तुमच्या दैनंदिन स्वयंपाकाला नवी चव देतात. कमी वेळात तयार होऊन पौष्टिकताही जपतात.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय स्वयंपाकघराची खासियत म्हणजे इथे पर्यायांची कधीही कमतरता नसते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कामातून वेळ मिळत नाही. तसेच जेवण बनवायला कंटाळा सुद्धा येतो. कधीकधी कांदा- बटाटे किंवा फोडणीचे साहित्य कापणं कठीण होते. अनेकांना कांदा आणि बटाटा न वापरता स्वयंपाक करणे अवघड वाटतं, पण योग्य भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला तर कमी वेळातही चवदार आणि पौष्टिक जेवण तयार होऊ शकते.

टोमॅटो आणि दुधीची मिक्स भाजी

अनेकांच्या आवडीची टोमॅटो आणि दुधीची भाजी हलक्या मसाल्यांसोबत खूप टेस्टी आणि पौष्टिक ठरते. दुधीमध्ये भरपूर फायबर असल्याने ही भाजी पचनक्रिया सुधारते आणि भाकरी किंवा भातासोबतही चांगली लागते. मेथीचे पान दही आणि बेसनात शिजवून बनवलेली भाजी आयरन, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडेंट्सने भरलेली असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिंग, हळद आणि हिरवी मिरची इतके मसाले तिचा स्वाद वाढवण्यासाठी पुरेसे असतात.

दही भेंडीची भाजी

कांदा न वापरता बनवलेली मसाला भेंडी ही रेस्टॉरंट-स्टाइलची चव देते. भेंडीला हलकी फ्राय टेक्स्चर देऊन त्यात मसाले मिसळल्याने ती झटपट आणि कमाल टेस्टी तयार होते.

पनीर भुर्जी

पनीर भुर्जीही कांदा आणि टोमॅटो न वापरता शिमला मिरची आणि हलक्या मसाल्यांसह बनवल्यास अतिशय स्वादिष्ट बनते आणि प्रोटीनने समृद्ध असते.

काकडीची भाजी

काकडीची मसालेदार भाजी गोड-तिखट चवीमुळे जेवणाला एक वेगळाच ट्विस्ट देते. उपवासात किंवा साध्या दिवशीही ही भाजी उत्तम लागते आणि पटकन तयार होते.

मेथी मलई मटर

मेथी मलई मटर ही कांदा-लसूण न वापरता बनवता येणारी लोकप्रिय आणि क्रीमी डिश आहे. काजू पेस्ट, मलाई आणि मेथीच्या चवीचा सुंदर संगम ही भाजी खास बनवते. कांदा आणि बटाटा टाळूनही अनेक स्वादिष्ट, हलक्या आणि पौष्टिक भाज्या तयार करता येतात. योग्य मसाल्यांचा वापर आणि थोडेसे क्रिएटिव्हिटी जोडल्यास कोणतंही जेवण चविष्ट बनवतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Ikkis OTT Release : धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT