Dahi - Indian Yogurt Tips : भारतीय आहारात असणारा महत्त्वाचा पदार्थ दही. ताटाच्या डाव्या बाजूत उन्हाळ्यात दह्याची वाटी असते. दिवसातून एकदा तरी किंवा दुपारच्या जेवणात प्रामुख्याने दह्याचे सेवन करायला हवे.
दह्यामध्ये प्रोटीन्ससोबत चांगले बॅक्टेरियादेखील मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे उन्हाळ्यात पाचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्यात आपण दही (Curd), ताक व लस्सी याचे सेवन करत असतो. काही महिलांना दह्याचे विरजण घरी लावण्याची सवय असते. परंतु, बाजारात (Market) मिळणाऱ्या घट्ट दह्यासारखं ते बनत नाही. जाणून घेऊया घरच्या घरी कसे बनवायचे ते
1. उन्हाळ्यात दही आंबट होण्याचे कारण काय?
गरम दुधात (Milk) विरजन घालून ते उबदार ठिकाणी ठेवल्यास दही आंबट होते. तसेच जर विरजण लावताना दही आंबट असेल तरी देखील ते खराब होते. दही सेट केल्यावर बाहेर उष्णतेत बराच वेळ राहू दिल्याने देखील असे होते.
2. घरी दही बनवण्यासाठी लागेल हे साहित्य
घरी दही बनवण्यासाठी फक्त दोन गोष्टींची गरज लागेल. क्रीम दूध व दोन चमचे दही. याचा वापर केल्यास दही मलईदार व घट्ट बनेल.
3. दह्याचे विरजण लावताना या टिप्स फॉलो करा
तुम्हाला किती दही हवे आहे हे ठरवा. त्यानुसार एका भांड्यात दूध घेऊन ते चांगले उकळावे. तुम्हाला एक लिटर दही सेट करायचे असेल तर तुम्हाला एक लिटर दूध घ्यावे लागेल.
आता एक भांडे घेऊन त्यात दोन चमचे दही घालून चांगले फेटून घ्या.
यानंतर दुधात फेटलेले दही मिसळा.
धक्का लागणार नाही अशा ठिकाणी झाकून ठेवा.
दही सेट करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. म्हणूनच रात्री सेट करायला ठेवा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदम ताजे व घट्ट दही मिळेल.
दही सेट करताना फ्रीजमध्ये ठेवू नये.
दही सेट करण्यापूर्वी लक्षात ठेवा की दूध जास्त गरम नसावे. दही फक्त कोमट दुधात घालता येते
दही सेट करण्यासाठी थंड दूध देखील वापरू नये. जर तुम्ही फुल क्रीम दूध वापरत नसाल घट्ट व मलईचे दही जमणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.