Sakshi Sunil Jadhav
इडलीला चायनीज ट्विस्ट देत तयार केलेले कुरकुरीत इडली मंचुरियन हा आजकाल सोशल मीडियावर मोठा ट्रेंड झाला आहे. संध्याकाळच्या नाश्त्याला कमी वेळात तयार होणारा आणि चवीला तिखट-तिखट झणझणीत पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
थोडी कोरडी किंवा कालची उरलेली इडली तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे ती तळताना लगेच फुटत नाही आणि कुरकुरीतपणा टिकतो.
इडली छोटे-मध्यम आकाराचे काप करा जेणेकरून ते सॉसमध्ये नीट मिसळतील.
इडलीचे तुकडे गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. हेल्दी फूड म्हणून एअरफ्रायर 8-10 मिनिटे वापरू शकता.
कढईत थोडंसं तेल गरम करून त्यात लसूण, आले, हिरवी मिरची आणि कांदा-ढोबळी मिरची परता.
शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, थोडासा सोया सॉस आणि चिमूटभर मीठ घालून मध्यम आचेवर तडका तयार करा.
2 चमचे कॉर्नफ्लोअर + थोडं पाणी मिसळून स्लरी तयार करा. ही मिश्रण सॉसला योग्य घट्टपणा देते.
तळलेली इडली सॉसमध्ये टाकून नीट हलवा. प्रत्येक तुकड्यावर सॉसचा कोट बसू द्या.
यामुळे इडलीचा क्रिस्पी टेक्स्चर टिकून राहतो आणि सॉस छान शोषला जातो. वरून कोथिंबीर, स्प्रिंग अनियन आणि तिळाचे दाणे टाकल्याने चव आणि लुक दोन्ही वाढतात.