Post Knee Surgery Care Tips Saam tv
लाईफस्टाईल

Post Knee Surgery Care Tips: वाढत्या वयात गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कशी घ्याल काळजी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोमल दामुद्रे

Knee Care After Surgery : बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये गुडघ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्याकरिता काहींना गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. शस्त्रक्रियेनंतर तुमच्या गुडघ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काय काळजी घ्याल याविषयी माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक, ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ प्रमोद भोर म्हणतात की, वयोमानानुसार शरीरात विविध बदल होत असतात आणि प्रत्येक अवयावर त्याचा परिणाम होत असतो विशेषतः हाडे कमकुवत होणे ही समस्या सर्वसामान्यपणे आढळून येते.

शरीरातील इतर सांध्यांपैकी गुडघ्याचे (Knee) सांधे अधिक संवेदनशील असतात, जे वयानुसार जवळजवळ प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करू शकतात. ऑस्टियोआर्थरायटिस-संबंधित गुडघेदुखी ही एक अत्यंत त्रासदायक स्थिती आहे. यामुळे एखाद्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.

जेव्हा सर्व वैद्यकीय उपचारांमुळे आराम मिळत नाही, तेव्हा गुडघेदुखी तीव्र होऊ शकते आणि त्यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो.याकारणाने गुडघ्याला सूज आणि अगदी विकृती देखील निर्माण होऊ शकते. जेव्हा संधिवात किंवा कोणत्याही दुखापतीमुळे असह्य गुडघेदुखी होते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जी रुग्णांसाठी एक वरदान ठरते आहे. ज्या रुग्णांना चालता येत नाही, प्रचंड वेदना होतात, दररोज वेदनाशमन औषधांचे (Medicine) सेवन करावे लागते आणि दैनंदिन कामे करण्यात अडचणी येतात अशा रुग्णांच्या बाबतीत ही शस्त्रक्रिया गेम चेंजर ठरली आहे.

1. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी असते?

गुडघा प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे ज्यामध्ये डॉक्टर गुडघ्याचा वेदनादायक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसवतात. गुडघा प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये फिमर बोन चे टोक बाहेर काढले जाते आणि तेथे उच्च दर्जाच्या प्लास्टिक किंवा धातूच्या मिश्र धातुंद्वारे बदलले जातात. ही प्रक्रिया वेदना कमी करते आणि सामान्य गुडघ्याचे कार्य पूर्ववत करण्यात मदत करते. बदललेला गुडघा सामान्य प्रमाणे कार्य करतो, परंतु सुरुवातीला रुग्णाला नवीन गुडघ्याने दैनंदिन कार्य करण्यास थोडा वेळ (Time) लागू शकतो.

अत्याधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहणे शक्य होईल. ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि अचूकपणे पार पाडली जाचे तसेच रुग्णालयातील कालावधी देखील कमी होतो आणि लवकर बरे होते. फिजिओथेरपिस्ट स्नायू बळकट करण्याच्या उद्देशाने काही व्यायाम प्रकार करण्याचा सल्ला देतील. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यातून बाहेर येण्याचा (रिकव्हरी) कालावधी व्यक्तीपरत्वे बदलत असतो. नव्याने प्रत्यारोपित केलेल्या सांध्याचा वापर ऑप्टिमाइझ करणे गरजेचे ठरते. पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष लागू शकतो. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही प्रक्रिया ही त्या व्यक्तींचे जीवनमान सुधारते.

2. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जीवन कसे जगाल?

सामान्यतः, गुडघा बदलण्याच्या एकूण शस्त्रक्रियेनंतर, रूग्णांनी 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे अपेक्षित आहे. शस्त्रक्रियेच्या दिवसापासून डॉक्टर तुम्हाला हालचाली करण्यास प्रोत्साहन देतील. दोन ते तीन आठवड्यांच्या आत, रुग्ण कोणत्याही वेदना किंवा आधाराशिवाय दैनंदिन कार्य सहज करू शकतील. सक्रिय जीवनशैलीचे अनुसरण करून आणि नियमितपणे व्यायाम केल्याने, रुग्ण त्वरीत सांध्यांमधील ऊर्जा परत मिळवू शकतात आणि काही महिन्यांत ते करू शकत नसलेल्या क्रियाकलाप पुन्हा करू शकतात.

कृत्रिम गुडघा प्रत्यारोपणाचा विचार करताना वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करणे गरजेचे आहे. जरी ते सामान्य गुडघ्यासारखे दिसत असले तरी काही मर्यादा आहेत ज्या लक्षात घेतल्या पाहिजेत. गुडघा बदलल्यानंतर मांडी घालून जमिनीवर बसणे योग्य नाही, कारण त्यामुळे इम्प्लांटचे आयुष्य कमी होते. कोणतीही समस्या आली तर घरगुती उपचार करण्यापेक्षा तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनची मदत घ्या.

वजन वाढल्याने सांध्यांवर भार येऊन ते लवकर खराब होऊ शकतात आणि जास्त दाब पडल्यामुळे कृत्रिम सांध्यांचे नुकसान होऊ शकते. गुडघे शरीराचे संपूर्ण भार सहन करत असल्याने, गुडघ्यांवर ताण कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात राखणे आवश्यक आहे.

चालणे, प्रशिक्षकांच्या सल्ल्याने व्यायाम आणि एरोबिक्स उपयुक्त ठरू शकतात. परंतु यापैकी कोणतीही क्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

धूम्रपान, मद्यपान आणि औषधांचा अतिरिक्त वापर टाळा, कारण या गोष्टी संसर्गाची शक्यता वाढवू शकतात आणि सांध्यांवर परिणाम करू शकतात.

केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेलीच अँटीबायोटिक्स घ्या. याव्यतिरिक्त औषधांचे सेवन केल्यास रूग्णांना संसर्गाचा धोका वाढतो.

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये यशाचा दर अधिक असतो. काही महिन्यांतच बहुतेक रूग्ण दैनंदिन कार्य करु शकतात. शस्त्रक्रियेनंतर व्यायामाला प्राधान्य देणे, सक्रिय जीवनशैली राखणे, वजन नियंत्रित राखणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT